Uncategorized

तरुणीच्या मृतेहावर लैंगिक अत्याचार, आरोपी जवळचा नातेवाईक 

Spread the love

कोझिकोड ( केरळ ) / विशेष प्रतिनिधी

               लोकांची मानसिकता किती रसातळाला गेली आहे हे केरळ च्या कोझिकोड जिल्ह्यात घडलेल्या एका प्रकरणातून समोर येत आहे. येथे एका तरुणाने अनैतिक संबंधातून तरुणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले. मुख्य म्हणजे तरुणीच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचार झाल्याचे तपासात आढळून आले आहे. 

सुरवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद घेतली पण तपास जसजसा तपास पुढे सरकत गेला तसतसं कथेला पूर्णपणे वेगळं वळण मिळालं. तपासादरम्यान, हे प्रकरण पूर्वनियोजित हत्या असल्याचं निष्पन्न झाले आणि तीन दिवसांतच या प्रकरणा उलगडा झाला.

ही घटना 24 जानेवारी रोजी घडली आणि मंगळवारी एका 36 वर्षीय आरोपीच्या अटकेनंतर धक्कादायक बाब उघडकीस आली. आरोपी पुरुष हा मृत महिलेचा जवळचा नातेवाईक असून त्याने तिच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचार केले. पीटीआयच्या वृत्तानुसार, 26 वर्षीय पीडित तरुणी एलाथूर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावातील औद्योगिक युनिटमध्ये गंभीर अवस्थेत आढळली. शनिवारी महिलेला रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा तिची प्रकृती गंभीर होती आणि काही वेळानंतर तिचा मृत्यू झाला. पीडिता फाशीला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याचा दावा आरोपीने सुरूवातीला केला.

आरोपी वैशाखने पोलिसांना सांगितलं की त्याने महिलेला फाशीवर लटकलेल्या अवस्थेत पाहिलं आणि त्याच्या पत्नीच्या मदतीने तिला रुग्णालयात नेलं. त्याने ते आत्महत्या असल्याचं भासवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. पण पोलिसांना त्याच्या जबाबात विरोधाभास जाणवू लागले आणि तपासात धक्कादायक गोष्टी उलगडत गेल्या. तपासात असं दिसून आलं की पीडितेचे आरोपीसोबत अनैतिक संबंध होते. मात्र, आरोपीला आता तिच्यापासून सुटका हवी होती. त्यामुळे, त्याने सुसाइड पॅक्टचं आमिष दाखवून मुलीला युनिटमध्ये नेले. त्याने तिला आश्वासन दिलं की जर ते एकत्र राहू शकत नसतील तर ते एकत्र आत्महत्या करतील. आरोपीने आधीच दोन फास तयार केले होते जेणेकरून पीडितेला संशय येणार नाही.

मृतदेहावर सुद्धा लैंगिक अत्याचार

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेने फासात डोकं ठेवताच, आरोपीने तिच्या पायाखालची खुर्ची लाथ मारून बाजूला केली. महिलेला सावरण्याची संधीच मिळाली नाही. खरं तर, ही पूर्णपणे पूर्वनियोजित हत्या होती. आरोपी तिथेच उभा होता आणि त्याच्या डोळ्यासमोर पीडिता वेदनेने तडफडत असल्याचं पाहत होता. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर, आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. फॉरेन्सिक रिपोर्ट्सनुसार, त्या पीडितेचा मृतदेह खाली उतरवल्यानंतरही तिच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या खुलाशामुळे प्रकरण आणखी भयानक झालं.

आरोपीची पुढची योजना रात्री परत येऊन युनिटची सीसीटीव्ही हार्ड डिस्क नष्ट करण्याची होती. तो पुरावे मिटवून कायमचा पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. पण पोलिसांना त्याच्या जबाबात काहीतरी संशयास्पद आढळलं. नंतर, पोलिसांनी युनिट सील केलं आणि डिजिटल पुरावे सुरक्षित केले. सखोल चौकशीत, आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. त्याने कबूल केलं की त्याचे पीडितेसोबत अनैतिक संबंध होते आणि ती महिला त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणत होती. त्यामुळे, त्याने तिच्या हत्येचा कट रचला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close