क्राइम

नवऱ्याने केली होती मोबाईलला मनाई बायको न मानल्याने दुसऱ्या मजल्यावरून फेकले 

Spread the love

रायपूर / क्राईम रिपोर्टर 

                  मोबाईल जीवनाचा अविभाज्य अंग बनला आहे. मोबाईल चे जीवनात महत्व असले तरी मोबाईल कुटुंबात क्लेश निर्माण करण्याचे मुख्य कारण बनत चालला आहे. मोबाईल मुळेच एका नवऱ्याने आपल्या बायकोला दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिले आहे. घटना छत्तीसगड च्या रायपूर येथून समोर आली आहे।

  पतीने पत्नीला मोबाईल वापरण्यास मनाई केली होती.पण तिला ते मान्य नव्हते. पत्नीला न पटल्याने पतीने तिला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. पत्नीला जखमी अवस्थेत डीकेएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी रायपूरमधील गुढियारी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. एका महिलेसाठी मोबाईल जीवघेणा ठरला. पत्नीचा मोबाईल पाहून संतापलेल्या पतीने तिला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. सध्या पत्नीला डीकेएस रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाचे व्यसन जगभरातील लोकांसाठी घातक ठरत आहे.

लहान मुलांसह सर्व वयोगटातील लोकांमध्ये मोबाईलची आवड वाढत आहे. त्यामुळे लोक आत्महत्या आणि खूनही करत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना रायपूरमधून समोर आली आहे. ज्यात पत्नीचा मोबाईल पाहून संतापलेल्या पतीने तिला दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली फेकून दिले.

पती सुनील जनबंधू कामावरून घरी परतले होते. यानंतर त्याने पत्नीकडे जेवण मागितले. मात्र जेवण देण्याऐवजी पत्नी तिच्या मोबाईलकडे बघण्यात व्यस्त होती. या गोष्टीचा पतीला इतका राग आला की त्याने पत्नीला घराबाहेर बाल्कनीत नेले आणि दुसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीतून खाली फेकून दिले. दरम्यान, या घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली. पतीच्या धक्क्याने खाली पडलेल्या पत्नीला गंभीर दुखापत झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना विकास नगरमध्ये घडली. तेथून महिलेला डीकेएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुढियारी पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close