महा सांस्कृति महोत्सवाला वर्धेकरांची पाठ
महा सांस्कृती महोत्सवातील 90% खुर्च्या खालीच
शासनाचा कोट्यावधी रुपयाचा खर्च पाण्यात
वर्धा /प्रतिनिधी
वर्ध्यात तीन दिवसीय महा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले कोट्यावधी रुपयाचा खर्च करून राज्यातील संस्कृतीचे आदान प्रदान होण्यासाठी हे आयोजन करण्यात आले असून वर्धेकरांनी चक्क या महोत्सवाला पाठ दाखवण्याचे चित्र महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दिसून आले. सुसज्ज अशी आसन व्यवस्था करण्यात आली परंतु 90% खुर्च्या रिकाम्याच असल्याने शासनाचा कोट्यावधी रुपयाचा खर्च पाण्यात गेल्याचे चित्र दिसत आहे मोठमोठे बॅनर शहर भरात लावण्यात आले परंतु कार्यक्रमांमध्ये 90% खुर्च्या खाली असल्याने संस्कृतीचे आदान प्रदान कसे होईल ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. शासन कोट्यावधीचा खर्च संस्कृतीचे जतन करण्यासाठी करते परंतु स्थानिक प्रशासनाकडे असलेली नियोजनाची प्रचार प्रसाराची जबाबदारी व्यवस्थित झाली नसल्यामुळेच तर पुढच्या रिकाम्या राहिल्या नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये दहा व अकरा तारखेला वर्धेकर कसा प्रतिसाद देते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.