सामाजिक

नवरात्रोत्सव निमित्त धानोरा (तरोडा) येथे भव्य आरोग्य शिबिरास प्रचंड प्रतिसाद

Spread the love

नवरात्रोत्सव निमित्त धानोरा (तरोडा) येथे भव्य आरोग्य शिबिरास प्रचंड प्रतिसाद
माँ भवानी चॅरिटेबल ट्रस्टचा व डी.एम. एक्स. ग्रुप चा स्तुत्य उपक्रम: ३५० नागरिकांची नेत्र तपासणी, ३० जणांचे उत्स्फूर्त रक्तदान
हिवरखेड:- मोर्शी तालुक्या अंतरंग येणाऱ्या धानोरा (तरोडा): धार्मिक सण आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधत माँ भवानी चॅरिटेबल ट्रस्ट, धानोरा (तरोडा) आणि DMX ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराला परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत हा उपक्रम यशस्वी केला.

नवरात्रोत्सव आणि सेवा पंधरवाड्याचे औचित्य साधून, मंगळवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी ट्रस्टच्या आवारात हे शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरासाठी अमरावती येथील ख्यातनाम महात्मे आय हॉस्पिटल च्या तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक विशेषत्वाने उपस्थित होते.

आरोग्य सेवेचा मोठा लाभ:
या एका दिवसाच्या शिबिरात ३५० हून अधिक गरजू नागरिकांनी आपल्या डोळ्यांची मोफत तपासणी करून घेतली. ग्रामीण भागातील अनेक वृद्धांना व इतरांना त्यांच्या नेत्रविकारांवर वेळीच योग्य मार्गदर्शन आणि उपचार मिळाले. शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांपैकी ज्यांना मोतीबिंदूचे ऑपरेशन आवश्यक आहे, त्यांचे ऑपरेशन मोफत केले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा आयोजकांनी केली. यामुळे अनेक गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, शिबिर स्थळी ₹२०० या नाममात्र दरात उच्च दर्जाचे चष्मे उपलब्ध करून देण्यात आले.

रक्तदानास उत्स्फूर्त प्रतिसाद:
आरोग्य शिबिरासोबतच आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३० तरुणांनी आणि नागरिकांनी उत्साहाने भाग घेऊन रक्तदान केले. रक्तदानाचे महत्त्व पटवून देत, ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ हा संदेश या निमित्ताने देण्यात आला. प्रत्येक रक्तदात्यास देवस्थानाच्या वतीने भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
आयोजकांचे कौतुक: समाजाप्रती आपले कर्तव्य ओळखून माँ भवानी चॅरिटेबल ट्रस्टने हा अत्यंत स्तुत्य उपक्रम हाती घेतला. या यशस्वी आयोजनासाठी माँ भवानी चॅरिटेबल ट्रस्ट धानोरा, ऋतिक गोपालराव मालपे आणि त्यांचा मित्रपरिवार यांनी विशेष मेहनत घेतली. गरीब व गरजू लोकांना आरोग्याच्या सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वसामान्य नागरिक आणि परिसरातील मान्यवरांकडून आयोजकांचे मोठे कौतुक होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close