अन किंग कोब्राणे तोंडातून एका मागून एक काढले तीन साप
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात काही मजेशीर , काही बोधात्मक तर काही इतके भयानक असतात की पाहतांना मनाचा थरकाप उडतो. सोशल मीडियावर सध्या किंग कोब्राचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एक भलामोठा किंग कोब्रा गिळलेले तीन साप एका मागून एक तोंडातून काढतो. हे दृश्य अनेक लोकांनी उघड्या डोळ्यांनी बघितले आहे. व्हीडीओ पाहतांना आपलाही थरकाप उडतो.
सापांच्या प्रजातींमधील किंग कोब्रा ही प्रजाती सर्वांत खतरनाक सापांपैकी एक मानली जाते. या सापामध्ये इतके विष असते की, त्याच्या दंशामुळे काही सेकंदांत व्यक्ती आणि प्राण्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे अनेक मोठे शिकारी प्राणीसुद्धा किंग कोब्रा सापापासून चार हात दूर राहतात. धक्कादायक बाब म्हणजे किंग क्रोबा भल्या मोठ्या सापांनाही आपले भक्ष बनवतो. सध्या अशाच एका भल्यामोठ्या किंग कोब्रा सापाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर हा साप किती धोकादायक असू शकतो याचा अंदाज तुम्ही लावू शकता. अंगाचा थरकाप उडवणारा असा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत एक भला मोठा किंग कोब्रा आपल्या तोंडातून चक्क तीन साप बाहेर काढताना दिसतोय.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका भल्यामोठ्या किंग कोब्रा सापाने एकाच वेळी तीन महाकाय विषारी साप गिळले होते. मात्र, काही वेळ तो रस्त्यावर येतो आणि तीनही साप एक एक करून तोंडावाटे बाहेर काढू लागतो. एकाचवेळी तीन साप गिळल्याने तो अस्वस्थ झाला होता. पोट सापांनी भरले, ज्यामुळे त्याला उलट्या होत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. उलट्या होत असताना किंग कोब्रा हळू हळू मागे सरकत तोंडातून एक एक करून तीन महाकाय साप बाहेर काढतो, हे दृश्य फारच भयानक दिसत होते.
अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “किंग कोब्रा इतर तीन सापांना बाहेर काढत आहे, जेव्हा तो अत्यंत तणावग्रस्त असतो तेव्हा असे घडते. आशा आहे की, त्याला सुरक्षित ठिकाणी नेले गेले असेल.” हा व्हिडीओ आतापर्यंत ४७ लाख लोकांनी पाहिला आहे आणि १४ हजार लोकांनी लाइक केला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत आणि अनेकांनी किंग कोब्राशी संबंधित इतर व्हिडीओही शेअर केले आहेत.
यापूर्वी देखील किंग कोब्रा आणि अजगराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात अजगराच्या विळख्यातून सुटून जीव वाचविण्यासाठी भलामोठा किंग कोब्रा प्रयत्न करताना दिसत होता. या व्हिडीओत एक लहान अजगराने किंग कोब्राचे तोंड पकडून त्याला दाबत होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे किंग कोब्रा खूप मोठा होता; पण अजगराच्या तावडीत सापडल्याने तो जागेवरून हलूदेखील शकत नव्हता. त्यामुळे किंग कोब्रा बेशुद्ध असल्यासारखा पडून राहिला. या व्हिडीओतून अजगर किती धोकादायक असतात; जे विषारी किंग कोब्रालाही आपली शिकार बनवू शकतात, हे दिसत होते.