राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस् चे जिल्हाध्यक्ष शिवराज वाकोडे यांच्यावर वलगाव जवळ खूनी हल्ला..
शिवराज वाकोडे सुरक्षित…
पोलिस स्टेशन वलगाव येथे गुन्हा दाखल….
सहा महिन्यापूर्वी मिळाली होती जीवे मारण्याची धमकी….
अमरावती / प्रतिनिधी
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस् चे जिल्हाध्यक्ष काही कामानिमित्त अमरावती येथे गेले असता परत् येताना काही गुंडांनी त्यान्चि गाडी अडवली व् त्यांच्यावर् प्राणघातक हल्ला केला.
सर्वप्रथम् त्यांनी त्यांची गाडी फोडली व त्यांना गाडीच्या खाली ओढून त्यातील तिघांनी शिवराज वाकोडे यांच्यावर खुनी हल्ला केला.
मारताना त्यांनी तुला आम्ही याआधी आम्ही चिठ्ठी पाठवली होती तु ऐकत नाही ना… असे बोलत होते…
त्यानंतर चोथ्या साथिदाराला बंदूक आण असे सांगितले. शिवराज वाकोडे यांना सर्व प्रकार लक्ष्यात आला व तेथे गाड्याही खूप ये जा करत होत्या. या गोष्टीचा फायदा घेत शिवराज वाकोडे यांनी त्याचा प्रतिकार केला. शिवराज वाकोडे व त्यांच्या सहकार्याने त्यांच्यावर गोटमार केली असता ते पळून गेले.
माझ्या जीवाला धोका असल्याची तक्रार मी सहा महिने आधी पोलीस स्टेशन गाडगे नगर अमरावती येथे केली होती पण असे होतच असते, गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे उत्तर ठाणेदारांनी दिले होते व कोणतीही चौकाशि केली नाही. त्याचा परिणाम म्हणजे हा हल्ला असल्याचे मत शिबराज वाकोडे यांनी व्यक्त केले व संरक्षण द्या अशी मागनि पोलीस प्रशासनाकडे करणार असल्याचे प्रतिपादन केले.