राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहीम तीन मार्चला…
आर्वी तालुक्यात 163 बूथ 6279 लाभार्थी
आर्वी शहरात 26 बूथ 3 हजार 784 लाभार्थी
तहसील कार्यालयात झाली सभा..
आर्वी -प्रकाश निखारे
तालुकास्तरीय समन्वय व सनियंत्रण समितीची सभा येथील तहसील कार्यालयात घेण्यात आली राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण या संदर्भात तहसीलदार हरीश काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली
केंद्र शासन व राज्य शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शन सूचनाची माहिती देण्यात येऊन मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सूचना या सभेत देण्यात आल्या
जागतिक आरोग्य संघटनेने 1988 मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले आणि त्यानुसार राज्यात सन 1995 पासून राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राविण्यात येत आहे यामध्ये पाच वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना पोलिओची लस देण्याची उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे पंचवीस वर्षे सातत्याने पोलिओ निर्मूलन करिता आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे .भारतामध्ये 13 जानेवारी 2011 नंतर आजपर्यंत एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही भारताला पोलिओ निर्मूलनाचे प्रमाणपत्र मार्च 2014 मध्ये मिळालेले आहे भारतातील सर्व राज्यांमध्ये 3 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहीम सर्व जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे बीओपीव्व्ही ही लस दिली जाणार आहे नगरपरिषद क्षेत्र आणि ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत ही मोहीम राबविण्यात येणार असून आर्वी तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये शून्य ते पाच वयोगटातील अपेक्षित लाभार्थी 6279 आहे
या लाभार्थ्यांना एकूण 163 बूथ वरून लस दिली जाणार आहे
आर्वी शहरांमध्ये एकूण अपेक्षित लाभार्थी 3684 असून या लाभार्थ्यांना एकूण 26 बूथ वरून तीन मार्च 2024 रोजी पोलिओ लस देण्यात येणार आहे
पोलिओ संक्रमणाचा धोका अजूनही आहे त्यामुळे प्रतिकारशक्ती ही उच्च दर्जाची राहण्यासाठी नागरिकांनी आपल्या शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना आरोग्य विभागामार्फत नियोजित करण्यात आलेला ठिकाणी नेऊन लस द्यावी असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले
या बैठकीला तहसीलदार हरीश काळे तालुकाआरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता झोपाटे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मोहन सुटे गटविकास अधिकारी सुनीता मरस कोल्हे नगरपालिका मुख्याधिकारी डॉक्टर किरण सुकलवार आदींची उपस्थिती होती