तत्काळ धान खरेदी केंद्र सुरू करा : नरेंद्र पहाडे
पवनी : जिल्ह्यातील बळीराजाची निसर्गाच्या लहरीपणातून सुटका होऊन पीक हातात येण्याची उमेद वाढली आहे. यंदा धानाचे विक्रमी उत्पादन होण्याची चिन्ह दिसत आहेत. अशात शासनाने लवकरात लवकर धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी युवा गर्जना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र पहाडे यांनी केली आहे.
मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यातील ‘ब’ दर्जाचे धान खरेदी केंद्र अद्यापही सुरु होण्याच्या चिन्ह दिसत नाहीत. शासनाच्या लावलेल्या जाचक अटी पूर्ण करण्याची ताकद खरेदी केंद्रात नसल्याने खरेदी केंद्र धारक अडचणीत सापडले आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासन बड्या उद्योगपतींना विविध सेवा देतो, वेळ पडली तर त्यांचे कर्जही माफ करतो. मग आमच्या बळीराजासोबत असा अन्याय का? असाही सवाल पहाडे यांनी सरकाराला विचारला आहे.
शासनाने धान खरेदी केंद्र सुरू केले नाही तर आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असे नरेंद्र पहाडे यांनी सांगितले आहे.
0000