नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पावसाच्या आगमनाने शेतकरी आनंदी
यंदा बैल पोळ्या उत्साहात साजरा तालुक्यातील बाजारपेठ रंगीबेरंगी साहित्याने सजले
नांदगाव खंडेश्वर/ पवन ठाकरे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जवळ पास एक महिन्याच्या कालावधीत पाऊस हा कुठे दिसे नासा झांला होता, सोयाबीन ची पिके ऑक्सीजन वर असतानां पाऊस पडला आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झालेले आहेत,
त्यामुळे येणाऱ्या पोळ्या निमित्य बैल सजावट करुन पोळ्या मध्ये आनले जातात,
भारतीय संस्कृतीनुसार श्रावणात सण, उत्सवाची उधळण होत असते. नागपंचंमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यांच्यासह पोळा हा सण ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पोळ्यानिमित्त नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विविध वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. त्यामध्ये बैलांसाठी निरनिराळे गोंडे, मातीचे बैल, आणि घुंगुरुच्या माळानी रंगीबेरंगी दोरे झुल दुकानेही सजली आहेत.
———————————–
दोन ते तीन दिवसां मध्ये जो पाऊस आला त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नव चैतन्य निर्माण झाले आहेत , आम्ही आनलेला बैल पोळ्याच्या सजावटी चा माल दुकानांमध्ये पडुन राहिल का अशी परिस्थिती निर्माण झाली होती, सोयाबिन सह सर्वच पिकांना पाऊस महत्वाचा होता आता शेतकरी खुश होईल बैल सजावटी सामान शेतकरी वर्गाच्या मोठ्या थाटात घेवुन जाईल,
विनय कनसे
दुकानदार नांदगाव खंडे
पोळा हा सण शेतकरी व बैलां साठी खुप महत्वाचा सण मानला जातो,
एक महिन्याच्या उलटुन गेला पण पाऊस कुठे दिसा नासा झाला होता त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते, पाऊसाचे संकट पोळ्या सणाला जानवेळ का अशी परिस्थिती निर्माण झाली होती,
पण आता पाऊस समाधानकारक आल्यांने पोळा सण उत्साहात साजरा करु,श्यामसुंदर पा राऊत
शेतकरी सुलतानपुर