सामाजिक

नालंदा येथील बुद्ध विहारात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

Spread the love

नालंदा बुद्ध विहार येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी. *प्रतिनिधी प्रदीप रघुते*
नालंदा बुद्ध विहार परिसरात क्रंतीबा ज्योतिराव फुले जयंती, विद्यार्थी मेळावा , महिला मेळावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या चार दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामधील पहिले पुष्प क्रांतिबा ज्योतिबा फुले यांची जयंती सोहळ्या मोठ्या स्वरूपात संपंन झाला. या भरगच्च कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. बाबसाहेब आंबेडकर बहुउद्देशीय अध्ययन मंचे चे अध्यक्ष शंकररावजी मेश्राम हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉक्टर संतोष बनसोड आणि समाजसेवक तथा सामजिक कार्यकर्ते ऍड.अरुण रौराळे धम्मपिठावर विराजमान होते. प्रा.डॉ.संतोष बनसोड यांनी क्रांतीबा ज्योतिराव फुले यांचे आधुनिक भारताच्या जडणघडणीत योगदान या विषयावर आपले विचार ठेवले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण रामटेके सर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा, वक्त्याचा परिचय सुरज मंडे सर यांनी करून दिला. तर आभार प्रदर्शन पद्माकरजी मंडोधरे सर यांनी पार पाडले. या कार्यक्रमाचे यशस्वीेते करिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय अध्ययन मंच चे अध्यक्ष, सचिव सह सर्व पदाधिकारी आणि नालंदा बुद्ध विहार परिसरातील बहुसंख्य उपासक उपासिका आणि नागरी उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close