सामाजिक
नायब तहसीलदार गडलिंग यांच्या कथित खाबूगिरीवर शिक्कामोर्तब ?

भुक्तभोगी व्यक्तीची जिल्हाधिकाऱ्यासह शासन दरबारी तक्रार
एजंट च्या हातून मागणी होत असल्याची बातमी नवप्रहार ने केली होती प्रकाशित
गडलिंग यांच्या अखत्यारीत चाललेल्या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी
नवप्रहार ने वेळोवेळी बातमी प्रकाशित करून प्रकरण आणले होते चव्हाट्यावर
संतापलेल्या गडलिंग यांनी नवप्रहार च्या संपादकांना 353 ,आणि 354 फसवण्याची दिली आहे धमकी
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
आल्यापासून आपल्या कथित खाबूगिरी साठी सतत चर्चेत असलेल्या नायब तहसीलदार नामदेव गडलिंग यांच्या खाबूगिरीचे आणखी एक प्रकरण समोर आले असून भुक्तभोगी व्यक्तीने याबाबत शासन आणि प्रशासन दरबारी तक्रार करून न्यायाची मागणी केली आहे.
तक्रारकर्ते अतुल शिरभाते यांनी केलेल्या तक्रारी नुसार त्यांनी त्यांचे घर ज्याचा प्लॉट क्र.64 आणि सर्वे नं. 112/ 3 आहे कौटुंबिक सदस्यांचे हक्कसोड लेखकरून त्याचा लहान भाऊ आकाश रूपराव शिरभाते याच्या नावाने करून दिले होते. काही दिवसांपूर्वी काही शासकीय कामासाठी 7/12 काढला असता त्यात चुकीचे क्षेत्रफळ असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी संबंधित तलाठ्याच्या लक्षात ही बाब आणून दिली होती. ती चूक दुरुस्त करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रकरण दाखल केले होते.
सदर प्रकरण नायब तहसीलदार नामदेव गडलिंग यांच्याकडे असल्याने त्यांनी मागितलेल्या कागदपत्रांची पूर्तता ज्यात तलाठ्याचा अहवाल आणि इतर कागदपत्र आवश्यक कागदपत्रे त्यांच्याकडे आणून दिली. आणि चूक दुरुस्त करुन घ्यावी यासाठी प्रतक्ष्यात त्यांना जाऊन भेटलो असता त्यांनी दिवसभर ताटकळत कॅबिन बाहेर उभे ठेवले. दरम्यान त्याला सचिन करडे नावाचा इसम येऊन भेटला आणि काम लवकर करावयाचे असल्यास साहेबांना 5 हजार रु.द्यावे लागतील असे बोलला. शिरभाते यांनी याती माझी काय चूक ? मी का पैशे द्यावे ? असे बोललो असता त्यांनी त्याला. महिन्याची तारीख दिली .
काही दिवसांनी अतुल याला तहसील कार्यालयात वाहन चालक असलेल्या तुषार मांडवगणे याचा फोन आला त्याने सुद्धा प्रकरण निपटवायचे असेल तर गडलिंग साहेबांना पैशे द्यावेच लागेल असे म्हटले. काही दिवसानंतर अतुल याला गडलिंग यांची कथित अवैध वसुली करणारा आणि तालुक्यात मी साहेबांचा साळा आहे असे मिरवणाऱ्या अजय भाकरदरे याचा कॉल आला आणि साहेब तुझ्या विरोधात निकाल देणार आहेत. आताही वेळ गेली नाही ते इतरांपासून खूप रक्कम घेतात तुझे काम 10 हजारात काम करून देतो असे सांगितले. सदर घटना 6 सप्टेंबर रोजीची आहे.यावेळेस देखील अतुल याने पैशे देण्यास नकार दर्शविला. शिरभाते यांच्या मते प्रतीक रॉय देखील गडलिंग यांचा एजंट म्हणून काम।करतो.
सा. नवप्रहार ने अधिकाऱ्याने पोसून ठेवलेल्या एजंट बद्दल पहिलेच दिली होती कल्पना – भ्रष्ट्राचारा वर लेखणीचा दणका या आपल्या ब्रीदवाक्यावर चालणाऱ्या सा. नवप्रहार ने नायब तहसीलदार ने तालुक्यात वसुली साठी एजंट पोसून ठेवले असल्याचे यापूर्वी सुद्धा प्रकाशित केलेल्या बातमीत छापले होते.
सा.नवप्रहार ने प्रकरण आणले होते चव्हाट्यावर – तालुक्यात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर घारीची नजर असणाऱ्या सा. नवप्रहार ने गडलिंग यांच्या कडून होत असलेल्या अवाजवी मागणी आणि गैरकायदेशीर कृत्याची प्रकरणे चव्हाट्यावर आणली होती . आणि अतुल शिरभाते यांनी तक्रारीत लिहिलेल्या बाबी घडतात यावर प्रकाश टाकला होता.
संपादकाला 353 आणि 354 मध्ये फसविण्याची धमकी – नायब तहसीलदार गडलिंग यांचा खरा चेहरा चव्हाट्यावर आणल्याने गडलिंग यांना त्यांच्या सवंगड्या कडून याबद्दल विचारणा झाल्याने त्यांना मिरची झोम्बली होती. आणि झालेल्या नामुष्कीची त्यांनी चिढुन जाऊन सा. नवप्रहार च्या संपादकाला 353 आणि 354 मध्ये फसवण्याची धमकी देऊन संपादकाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला होता.
पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची केली आहे मागणी – गडलिंग यांची पोलखोल झाल्याने गडलिंग याने खोट्या प्रकरणात फसवण्याची धमकी दिल्यामुळे हा पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्यावर नवप्रहार च्या संपादकांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना तक्रार करून गडलिंग यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करम्याची मागणी केली आहे. ( क्रमशः)