घाटंजी येथे शेत शिवारात हडंबा मशिन मधे फसून कामगाराचा मृत्यू
घाटंजी ता प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
आज दी.26/5/24 रोजी पांढूर्णा रोड वरिल गट न. सोळा संजय बाळा जी पालतेवार यांचे मालकीत असून सध्या गजानन पलिकूंडवार यांच्या वाहतीत आहे.या शेत शिवारात दूपारी 3.30 च्या सूमारास तिळ काढतांना हेडंबा मशिन मधे फसून पांढूरंग अंबादास दीनगुले वय वर्ष 63 रा विद्या भुवन वार्ड घाटी येथिल शेतमजूराचा अकस्मित मृत्यू झाला. सदर शेतमजूर मशिन मधे तिळ काढतांना मशिन ज्याम झाल्याने त्यात अडकलेला केर कचरा काढतांना अच्यानक पणे तोल गेल्याने मशानमधे फसला.ह्या घटनेत सदर व्यग्तीचा अक्षरशा पायाचा व मांडीचा भाग मशिन मधे फसल्याने पुर्ण पणे चुराडा झाला. अच्यानक झालेल्या या घटनेतील मृतका मागे दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. घाटंजी पोलिसांनी मृतकाचा देह मशिन मधून स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढला आणि पुढील तपास सूरु केला असून घटनास्थळी जाऊन तलाठी यांनी ही माहीती नोंद घेतली. त्यावेळी बघ्याची गर्दी जमली होती.