विशेष

तृतीयपंथीयांची अशी काही रहस्ये जी जाणून घेण्यास सगळेच असतात इच्छुक 

Spread the love

                  तृतीयपंथी किंवा किन्नर यांच्या बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. पण या समजातील लोकं अनेक बाबी गुप्त ठेवत असल्याने त्यांच्या बद्दल फार कमी माहिती बाहेर येते. आमच्या कडे काही त्यांच्याशी संबंधित रंजक बाबी आल्या आहेत. चला तर जाणून घेऊ काय आहेत त्या ?

1. एखाद्या तृतीयपंथीयाचा मृत्यू झाला की त्याचे अंतिम संस्कार गुप्त ठेवले जातात. इतर सामान्य व्यक्तींप्रमाणे नपुंसकांची शेवटची यात्रा दिवसाऐवजी रात्री काढली जाते.

2. नपुंसकांचे अंत्यसंस्कार लपवून केले जातात. त्यांच्या समजुतीनुसार, जर एखाद्या सामान्य माणसाने तृतीयपंथीयाचे अंत्यसंस्कार पाहिले, तर जो माणूस मरतो तो तृतीयपंथीय म्हणून पुन्हा जन्म घेतो. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मृतदेहाला बुटा आणि चप्पलेने मारहाण केली जाते. असे करून त्या जन्मी केलेल्या सर्व पापांचे प्रायश्चित्त होते असे म्हणतात.

3. तृतीयपंथीय जरी हिंदू धर्मातील अनेक प्रथा पाळत असले, तरी त्यांचे मृतदेह जाळले जात नाहीत. त्यांचा मृतदेह पुरला जातो.

4. आपल्या समाजातील एखाद्याच्या मृत्यूनंतर, तृतीयपंथीय पुढील एक आठवडा अन्न खात नाहीत.

5. किन्नर समाज आपल्या कोणत्याही सदस्याच्या मृत्यूनंतर शोक करत नाही. त्यामागील कारण म्हणजे मृत्यूनंतर तृतीयपंथीयाला नरक जीवनातून मुक्ती मिळाली. मृत्यूनंतर, तृतीयपंथीय समुदाय आनंद साजरा करतात आणि त्यांचे दैवत अरावण यांना पुढील जन्मात मृत्यू झालेल्या व्यक्तीला किन्नर बनवू नका, अशी विनंती करतात.

6. तृतीयपंथीयांचे वर्षातून एकदा लग्न होते. हा विवाह भगवान अरावणासोबतही होतो. अरावणाची मूर्ती शहराभोवती नेली जाते. दुसर्‍याच दिवशी, तृतीयपंथीय आपला मेकअप उतरवतात आणि विधवांप्रमाणे शोक करतात आणि पांढरे कपडे घालतात.

7. तृतीयपंथीयांच्या बहुतेक परंपरा हिंदू धर्मानुसार केल्या जातात, परंतु बहुतेक गुरू मुस्लिम आहेत.

8. बहुतेक तृतीयपंथीय 6 वाजेपर्यंत उठतात. 10 वाजेपर्यंत नाश्ता करून ते कामावर निघून जातात. तृतीयपंथीयांची सर्वाधिक कमाई ट्रेनमध्ये गाण्याद्वारे होते. याशिवाय दुकानदारांकडून गोळा करून ते एका दिवसात 250 ते 1200 रुपये कमावतात.

9. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ते ट्रेन पकडल्यानंतर घरी परततात. रात्री 10 वाजेपर्यंत जेवण करून 11.30 वाजेपर्यंत सर्व झोपायला जातात.

10. इतिहासात काही तृतीयपंथीयांनी युद्ध लढल्याचाही उल्लेख आहे. मलिक काफूर हा त्यापैकी एक होता. त्याने दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिलजीसाठी दख्खनमधील लढाई जिंकली.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. नवप्रहार त्याची हमी देत नाही.)

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close