तो मोबाईल घेऊन पळाला पण असे काय घडले की त्याला यावे लागले परत
जगाच्या पाठीवर अनेक घटना घडत असतात. त्या घटनांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांपैकी काही खरोखरच खूप मजेदार असतात जे आपलं मनोरंजन करतात. म्हणून मग आपण त्यांना सारखेसारखे पाहतो, एवढेच काय तर आपण आपल्या मित्रांना देखील पाठवतो आणि या व्हिडीओंचा आनंद लूटतो.सोशल मीडियावरील काही व्हिडीओ मनोरंजक असतात, तर काही व्हिडीओ हे दुसऱ्यांसाठी उदाहरण ठरतात.
आजकाल अनेक चोरीची प्रकरणे समोर येत आहेत. कधी कुठे कशा प्रकारे चोरी होईल, याचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही. दिवसेंदिवस अशी प्रकरणे अधिक होत चालली आहेत. सध्या सोशल मीडियावर एका चोराने चोरी केल्याचा व्हिडीओ इंटरनेटच्या जगात व्हायरल झाला आहे. हा मजेदार व्हिडीओ आतापर्यंत शेकडो वेळा पाहिला गेला आहे आणि मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी त्याला पसंत देखील केला आहे. हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे.
लोकांना वस्तू हिसकावून पळून जाताना तुम्ही पाहिलं असेल. कुणी कुणाचा फोन हिसकावून पळून जातो, तर कुणी दुसऱ्याची चेन हिसकावून घेतो. अनेकवेळा चोर घरात किंवा दुकानात घुसून चोरी करतात. असाच काहीसा प्रकार ब्रिटनमधील ड्यूसबरी येथे घडला. दुकानदाराचा १६०० पौंड किमतीचा फोन हिसकावून चोर पळत असताना दुकानाचा दरवाजा अचानक बंद झाला. दरवाजा बंद असल्याने चोर तिथेच अडकला आणि त्याला पळता आले नाही. चोर दुकानात परतल्यानंतर त्याने दुकानदाराला फोन परत केला. वास्तविक, चोरीसारख्या घटना टाळण्यासाठी दुकानदाराने त्याच्या दुकानाला रिमोट कंट्रोलिंग लॉक बसवले होते
दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा व्हिडिओ रेकॉर्ड झाला असून तो आता सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. @Sachkadwahai नावाच्या पेजने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चोराची अवस्था पाहून लोक हसत आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत ‘चोराला चांगलाच धडा मिळाला असल्याचे’, सांगितले. अनेकांनी या व्हिडिओवर हसणारे इमोजी पोस्ट केले आहेत.