क्राइम

निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या  तृतीयपंथीयाची हत्या

Spread the love

लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने घालून वावरायचे

 सोलापूर / विशेष प्रतिनिधी

आगामी महानगर पालिका निवडणुकीत नगरसेवक होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तृतीयपंथीयाचा खून झाला आहे. यामुळे शहरासह परिसरात खळबळ माजली आहे.

अय्युब सय्यद (वय 40 वर्ष, रा लष्कर, सोलापूर) असं त्या तृतीयपंथीयाचं नाव आहे. अय्युब सय्यद हे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होते. त्यांनी प्रभाग 16 मधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती, मात्र त्यापूर्वीच हत्या झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे. आजूबाजूच्या नागरिकांनी माहिती देताना सांगितलं की, अयुब सय्यद यांच्याकडे लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने होते. हत्या करणाऱ्यांनी सर्व सोने लंपास केले आहेत. हत्या करणाऱ्यांनी कानातील सोने ओरबाडून कान फाडून घेऊन गेले आहेत.

सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता

तृतीयपंथी अय्युब सय्यदयांनी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग 16 मधून तयारी सुरू केली होती. अय्युब सय्यद यांनी त्यांच्या प्रचाराचे व्हिडिओ आणि फोटो स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला लाखोंच्या संख्येने प्रतिसाद मिळत होते. अय्युब सय्यद यांना सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळत होती. पारलिंगी समुदायातील व्यक्ती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणुकीआधीच पारलिंगी अय्युब सय्यद यांच्या हत्येमुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला मोठा धक्का बसला आहे.

पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज

तृतीयपंथी अय्युब सय्यद यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सदर बाजार पोलीस करत आहेत. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही सारखे महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. शहरातील लष्कर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्ती अय्युब सय्यद यांच्या घरात प्रवेश करताना दिसून आले आहेत. हेच तीन संशयित मध्यरात्री 2च्या सुमारास घराबाहेर पडताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. काल शनिवारी दुपारी ही मृत्यूची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या तिघांवर मुख्य संशय व्यक्त केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close