नॅशनल मजदूर युनियन शाखा धामणगाव तर्फे भव्य रक्तदान शिबिर

तालुका प्रतिनिधी: प्रकाश रंगारी
चांदुर रेल्वे येथे नॅशनल रेल्वे मजदूर युनियन धामणगाव धामणगाव शाखा यांचेकडून शुक्रवार दिनांक 23 2 2024 चांदूर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये झाले भव्य रक्तदान शिबिर या शिबिराचे उद्घाटक मंडळाचे सचिव एस के जहा यांच्या हस्ते सकाळी साडेनऊ वाजता केल्या गेले. यावेळी T, I, नितेश कुमार, शाखा अध्यक्ष विक्रम सिंह, सचिव देवेश बाजपीय, उपस्थित होते. यावेळी या रक्तदान शिबिरामध्ये 112 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. म्हणून मागील 2013 पासून नॅशनल रेल्वे युनियन तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या सर्व रक्तदात्यांनी आपले रक्त देऊन जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर मध्ये जमा केले जाते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी युनियन कडून श्री अनिल भटकर, अजय दुबे,दीपिका बाजपेयी,हरीश मंथनवर, ओम वीर सिंह,राजेंद्र बनकर,प्रदीप बागडे,शिवदास मीना,हंसराज मीना, सौरव पांडे सोबतच ब्लड बँक तर्फे ब्लड बँक तर्फे संदीप कावळे,किशोर खोब्रागडे,आशिष चौधरी प्रेरणा शिंदे,श्रवण येलकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी भाजप साहेबांनी सांगितले की, येईल काही वर्षापासून युनियन हे सामाजिक कार्य करीत आहे. कोरोना आल्यानंतर जसे दुष्काळ,दुर्घटना सुनामी असे संकटकाळी रेल्वे मजदूर युनियन पुढे येत आहे. कोरोना काळात सुद्धा रेल्वे युनियनने प्रधानमंत्री कोश मध्ये एक करोड 28 लाख रुपये पाठवले होते. युनियन मजदूराच्या हाताची रक्षा करण्यासाठी त्यांच्या कार्यासाठी ते सर्वांना परिचित आहेत.