सामाजिक

देशभरासह धामणगाव रेल्वे मध्ये ईद उल फीत्र म्हणजेच रमजान ईद उत्साहत साजरा

Spread the love

धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी

धामणगाव रेल्वे शहरातील सर्व मुस्लिम बाँधवानी आज धामणगाव रेल्वे शहरातील ईदगावर एकत्र होत जामा मजीत चे इमाम हाफिज अख्तर यांचे नेतृत्वाखाली नमाज अदा केली , व एकमेकाना रमजानईद च्या शुभेच्छा देत देशात राष्ट्रीय एकात्मता सर्व धर्म समभाव असावा हा संदेश देण्यात आला . गेल्या महिनाभर मुस्लिम बांधवांनी रोजे ठेवले होते आज रमजान च्या निमित्याने सर्व रोजे संपले असून आज सर्व बांधव एकमेकांना शुभेच्छा देत सर्वांना सहभागी करून शीर खुरमा पिऊन ईद साजरी करतात . व लहान मुलांसाठी ईद चा उत्साह काही वेगळाच असतो लहान मुलांना आज ईदी म्हणून खाऊ मिळतो पैसे मिळतात त्यामुळे ईद चा उत्साह लहानग्यांच्या चेहऱ्यावर अधीकच खुलून दिसते , व आज सर्व मुस्लिम बाँधवानी धामणगाव रेल्वे शहरातील ईदगावर सामूहिक नमाज अदा केली .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close