क्राइम

मुलीला का छेडता म्हणून हटकले आणि हेच मारेकऱ्यांना खटकले 

Spread the love

टवाळखोर पोरांना जाब विचारणाऱ्या वडिलांची हत्या 

नागपूर / प्रतिनिधी 

               रस्त्याने जाता येता मुलीची छेड काढणाऱ्या वडिलांना त्या टवाळखोर मुलांना अशी विचारणा करणे महागात पडले आहे. त्या टवाळखोर मुलांनी त्यांना भेटायला बोलावून त्यांची चाकूने भोसकून हत्या केली आहे.

नागपूर शहरातील इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली घडली आहे. नरेश वालदे (53) असं हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. ते पेंटिंगचं काम करत होते.

गेल्या अनेक दिवसांपासून एक गुंड मृतक नरेश वालदे यांच्या मुलीला त्रास देत होता. या कारणावरून नरेश वालदे आणि त्या गुंडात काही दिवसांपूर्वी वादही झाला होता. त्यावेळी त्या आरोपींनी नरेश वालदे यांना जीवानिशी ठार मारू अशी धमकी देखील दिली होती.

फोन करुन बोलवलं अन्…

बुधवारी, 26 मार्च रोजी दुपारच्या सुमारास नरेश वालदे आपल्या कामात व्यस्त होते. त्यावेळी त्यांना अज्ञात मोबाईल नंबरवरून कॉल आला आणि त्यांना भेटण्याकरिता जाटतरोडी भागात बोलावले. नरेश हे दुचाकीने तिथे पोहोचले. त्यावेळी आरोपी हे आधीच तिथे उपस्थित होते. आरोपींनी धारदार शस्त्रांनी वार करत नरेश वालदे यांची हत्या केली आणि पळ काढला.

नरेश वालदे त्यांच्या वृद्ध आई आणि तीन मुलींसह नागपुरातील इमामवाडा परिसरात राहतात. आरोपी नेहमीच मुलींना त्रास देतात या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता. मंगळवारी, 25 मार्चच्या रात्री ही नरेश वालदे यांच्या घरावर काही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली होती. त्याची तक्रार इमामवाडा पोलिस ठाणे येथे दाखल केली असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत पोलिस विभागाकडून कुणीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close