मुलीचे अपहरण पण ……
मागील काही काळात महिला वर्गावर होणाऱ्या अत्याचारात कमालीची वाढ झाली आहे. सोबत काही वेळा मुली आणि तरुणींच्या अपहरणाचा प्रयत्न होतो. त्यातील शुल्लक वेळी जनतेच्या सतर्कतेमुळे तो फसतो. या प्रकरणात देखील असेच काही घडले आहे.
सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एका माणसाने एका मुलीचं अपहरण केलंय, पण त्यात पुढे नेमकं काय घडलं ते पाहा…
धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा धक्कादायक व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, दोन मुली रस्त्याने जात असताना एक अपहरणकर्ता त्यातल्या एका मुलीचे अपहरण करतो. जबरदस्तीने तिला खेचून एका व्हॅनमध्ये बसवतो. मुलगी आपल्याला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करते, पण तो तिला व्हॅनमध्ये बसवतो. तिच्याबरोबर असलेली दुसरी मुलगी हे पाहून खूप घाबरते आणि तिथून पळून जाते. हे सगळं एक माणूस पाहतो आणि त्या मुलीच्या मदतीला अगदी देवासारखा धावून येतो. मुलीला व्हॅनमध्ये जबरदस्तीने बसवलेलं पाहताच तो माणूस तिची मदत करण्यासाठी अपहरणकर्त्याला मारायला जातो.
हा धक्कादायक व्हिडीओ @shinewithzme या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून ‘त्या माणसाबद्दल मला आदर आहे’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. एका दिवसापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडीओला तब्बल ५.७ मिलियन व्ह्युज आले आहेत. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही व या घटनेत पुढे नेमकं काय घडलं याची माहितीदेखील समोर आलेली नाही.ह
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, ‘तिच्या मैत्रिणीला तिची पर्वा नव्हती’, तर दुसऱ्याने ‘पुरुष धाडसी असतात’ अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, ‘म्हणून मुलींवर कधीच विश्वास ठेऊ शकत नाही.’ तर एकाने ‘तुम्ही मुलीला दोष देत आहात, तिने मैत्रिणीला वाचवायचा प्रयत्न केला असता तर तिचेही सहज अपहरण झाले असते, तुम्ही अपहरणकर्त्याला नाही तर त्या मुलीला दोष कसे देेत आहात?’ अशी कमेंट केली.