महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयात वर्ग ११ वी विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व शिक्षण सप्ताहाचे आयोजन
हिवरखेड. स्थानिक सर्वोदय शिक्षण समिती द्वारा संचालित महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 22 जुलै रोजी वर्ग ११ वीत प्रवेशित विद्यार्थ्यां करिता स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते तसेच माननीय शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय पुणे. या अंतर्गत शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
या याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्रा. सौ. थोरात मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुभाष पारीसे प्रा. सौ.मेघा सोमकुवर प्रा.अमोल इंगळे सर उपस्थित होते.
सर्वप्रथम संस्थेचे आराध्य दैवत महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. इंगळे सरांनी करताना त्यांनी वर्ग ११ वी मुलांचे स्वागत संकल्पना व शिक्षण सप्ताहाची पार्श्वभूमी समजून सांगितली त्यानंतर प्रा. पारीसे सरांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वागत संदर्भात तसेच शिक्षण सप्ताहाचे महत्त्व पटवितांना शाळे हे संस्काराचे केंद्र आहे. येथे त्यांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी ही शिक्षकांची असते. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या विचारांची देवाणघेवाण करतांना विद्यार्थ्यांत शिस्त महत्त्वाची असते.कला शाखा ही सर्व शाखांची जननी आहे म्हणूनच विद्यार्थ्यांना भविष्यात येणाऱ्या समस्या -अडचणी तसेच स्पर्धांमध्ये टिकून राहता येण्यासाठी कला शाखेचे महत्त्व अनन्यसाधारण असते हे पटवून दिले. प्रा. सोमकुवर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना कला शाखा ही विद्यार्थ्यी विकासाचे उगम स्थान आहे याबद्दल विशेष माहिती पटवून दिली. प्रा .थोरात मॅडम यांनी अध्यक्षीय भाषणात शिक्षण सप्ताहाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना आपली प्रगती कशी करता येईल त्यांच्यातील कलागुणांचा विकास करण्याच्या दृष्टीने शिक्षण सप्ताहाचे महत्त्व पटवून दिले. यानंतर वर्ग ११ विच्या मुलांना गुलाब पुष्प व लाडू देऊन स्वागत करण्यात आले
या कार्यक्रमात वर्ग ११ व १२ विचे नवनियुक्त वर्ग नायक – नायिका चि.संकेत अकोलकर, चि.निखिल सिरसाम, कु.चैताली भडके कु. नर्गिस बानो व विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन कु.टिना शेंडे कु.तृप्ती वाघाडे यांनी केले.
या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांनी तसेच मधुकरराव कवठकर, हिंमतराव खवले यांनी विशेष परिश्रम घेतले.