माळीपुरा येथील युवकाची राहत्या घरात आत्महत्या

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
राजेश सोनुने पुसद तालुका
प्रतिनिधी ।
पुसद -शहरातील माळीपुरा येथे राहणाऱ्या युवकांनी दि.१२ ऑगस्ट २०२३ रोजीच्या दुपारी २ वाजताच्या दरम्यान घरात एकटा असताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.शहर पोलीस पोलिसांकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पंकज दिगंबर मडके वय ३८ वर्षे रा.माळीपुरा असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. सूत्रांकडून मिळालेले माहितीनुसार पंकज ने दि.१२ ऑगस्ट २०२३ रोजीच्या दुपारी २ वाजताच्या दरम्यान घरामध्ये एकटा असताना त्याने दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.मात्र त्याची पत्नी गेल्या आठ महिन्यापासून माहेरी राहत असल्याच्या कारणावरून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.पंकज चे शव येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदना करिता दाखल करण्यात आले होते.वृत्त लिहोस्तोवर शहर पोलिसांकडून कारवाई सुरू होती.त्याच्या पश्चात आई,वडील,एक भाऊ, एक बहीण,त्याची पत्नी व तीन वर्षाची मुलगी असा आप्त परिवार आहे.त्याच्या निधनामुळे माळीपुरा परिसरामध्ये शोककळा पसरला आहे.