शैक्षणिक

हमीभावाकरिता कारंजा येथे शेतकऱ्यांचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलदार मार्फत पंतप्रधानांना निवेदन

Spread the love

 

 

(दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला दिले समर्थन)

 

 

 आर्वी ,प्रतिनिधी/ पंकज गोडबोले 

 

 

आर्वी : कारंजा:- दिल्ली सिमाक्षेत्रावर अविरत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला जाहीर समर्थनाची घोषणा करून आंदोलनातील सर्व मागण्यांची पूर्तता केंद्र सरकारने लवकरात लवकर करावी. तसेच आंदोलनात शहीद झालेल्या शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी एक कोटी रुपये मदत राशी देण्यात यावी , अशी मागणी करीत आज शेतकरी नेते बाळा जगताप यांच्या नेतृत्वात संयुक्त किसान मोर्चा द्वारे तहसीलदार आर्वी यांच्या मार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले. 

प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत जिल्ह्य़ातील 2 लाख 27 हजार शेतकऱ्यांनी नोंद केली. नुकसानीची माहीती पाठविली, परंतु खरीप व रब्बीचे कोणतेही चुकारे अद्याप बहुसंख्य शेतकर्यांना मिळालेले नाहीत. ते तात्काळ देण्याचे करावे. तसेच सोयाबीन पीकाचे मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य येलो मोझैक रोगाने नुकसान झाले आहे . त्या शेतकरी बांधवांना नूकसान भरपाई अजुनही मिळालेली नाही . याबाबत शासनाने स्पष्टतः करावा

 पीक विम्याचे अंतर्गत वर्धा जिल्ह्यातून यावर्षी 2023-24 ला केंद्र सरकार व राज्य सरकारच्या मार्फत 10 टक्के प्रिमियम जवळपास 375 कोटी रुपये विमा कंपनीला चूकता केले. आतापर्यत शेतकऱ्यांना जवळपास केवळ 36 ते 38 कोटी रुपये विमा प्राप्त होण्याची शक्यता आहे. म्हणजे जवळपास 330 – 335 कोटी रुपयांचा फायदा विमा कंपनीला शेतकर्यांच्या नावावर होत आहे असे दिसते.‌ 

म्हणून शेतकरी आंदोलनाची मागणी आहे की केंद्र आणि राज्य सरकारची विमा कंपनीला जाणारी प्रीमियमचा रक्कम दरवर्षी शेतकरी सानुग्रह राशी फंडाच्या नावावर जिल्ह्यांना द्यावी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत समिती गठन करून ती राशी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटण्यात यावा. याबाबत योग्य निर्णय घ्यावा ही विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. 

शेती उत्पादनाला शासनाचा हमीभाव उत्पादन खर्चाच्या दीडपट (C-2) घोषित करावा . तसेच हमीभावात सर्व शेती उत्पादनांची खरेदी झाली पाहिजे यासाठी हमीभावाला कायद्याचे स्वरूप प्राप्त करून द्यावे.‌

त्याचप्रमाणे शेतीला दररोज दिवसा किमान बारा तास वीजपुरवठा मिळाला पाहीजे. तसेच शेतीवरील वीजबील माफ करण्यात यावे.

तसेच जिल्ह्यामध्ये जवळपास 2.5 लाख हेक्टर शेती ओलिताखाली येईल एवढे पाणी प्रकल्पांमध्ये उपलब्ध आहे. परंतू पाणी पोहोचवण्याची योग्य सुविधा नसल्याने केवळ 10 टक्के (50 हजार हेक्टर) शेती ओलिताखाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला पाण्याची सोय करून देण्यासाठी शासनाने योग्य नियोजन , सुविधा व फंड उपलब्ध करून ओलिताचे क्षेत्र वाढवायला सहकार्य करावे.

 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जंगली जनावरांच्या/श्वापदांच्या मार्फत होणारे पीकांचे नुकसान व मनुष्य जीविताला होणारा धोका या संबधीत वन विभागाने नियमानुसार पीकांच्या नुकसानीचे पैसे हे शेतकऱ्यांना पंचनामे झाल्यानंतर एक महिन्याच्या आत खात्यात जमा झाले पाहिजे. तसेच जनावरांचा योग्य तो बंदोबस्त लावण्यात यावा. 

शेतकरी आंदोलनात 21 फेब्रुवारी 2024 ला सैनिकी हल्ल्यामध्ये शहिद झालेल्या युवा शेतकरी शहिद शुभकरण् ला आदरांजली व्यक्त करतो व शासनाने लवकरात लवकर शेतकरी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सहयोग द्यावा या विनंती सह शेतकरी नेते बाळा जगताप यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले ….!

प्रहार सोशल फोरम चे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते बाळा जगताप यांच्यासह अरसलान खान,सागर चोपडे. रोहित घागरे प्रशांत डोंगरे. मयूर घागरे साहिल इखार. रवी दिवाने. प्रतीक दहिवडे. अभय नासरे स्वप्नील ढोबळे,राजूभाऊ तेलखडे, दिलीप डोंगरे, चिरकुट डोंगरे,कैलास साठे, मनोहर उईके,राहुल फुले संजय घोडे अक्षय भोने सुरेश वानखडे भूषण घोडे, प्रफुल नेहारे किशोर रामटेके संग्राम ठाकूर शरद ईवनाते गजानन बोरजे राजू काळे ताराचंद कोवे इत्यादी शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. नेतृत्वात तहसीलदार मार्फत पंतप्रधानांना निवेद

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close