सरकार स्थीर. सर्व आमदार पात्र एकनाथ शिंदे यांनी पुन्हा बाजी मारली
मुंबई / प्रतिनिधी
(राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष बातमीपत्र)
भारतीय राजकारणातील एक महत्वाचा निर्णय महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वाचून दाखवला. महाराष्ट्रच नव्हे, तर अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचे वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर केले आणि एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब केले. शिंदे गटाच्या समर्थकांनी ढोल-ताशा वाजवून व फटाके फोडून विजयाचे स्वागत केले आहे.
मूळ शिवसेना पक्ष म्हणून एकनाथ शिंदे गटाला मान्यता देत असल्याचं सांगत राहुल नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे.शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे , शिवसेना पक्षप्रमुख एकटे गटनेत्याला पदावरुन काढू शकत नाहीत सोळा अपात्र आमदारांची याचिका फेटाळून लावली आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय राहूल नार्वेकर यांनी दिला. शिवसेनेच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीला अंतिम निर्णयाचे अधिकार आहेत. पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची केलेली हकालपट्टी अमान्य आहे, असं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.
शिंदे कडे पक्षांतर्गत बहुमत आहे. सुनील प्रभूंना पक्षादेश काढण्याचा अधिकार नाही. शिवसेनेने मुदत संपल्यानंतर निवडणूक घेतली नाही. उद्धव ठाकरे साहेब उलट तपासणीला आलेत नाहीत. हकालपट्टीचा अधिकार पक्षप्रमुखांना नाहीत. पक्षप्रमुख केवळ नामधारी असतात खरी ताकत राष्ट्रीय कार्यकारिणी कडे असते. सुनील प्रभू यांच्या प्रतिज्ञा पत्रात अनेक कमतरता होत्या. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बेकायदा होती. शिंदे कडे पक्षांतर्गत बहुमत आहे. गोगावलेला प्रथम म्हणून मान्यता. अशा महत्त्वाच्या गोष्टींचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकाल वाचनात केले. उध्दव गटाची याचिका फेटाळून उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला फार मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह सोळा आमदार पात्र ठरल्याने सरकार आता आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे. याच बरोबर ठाकरे गटाचे चौदाही आमदार पात्र ठरले आहेत. आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ व तेथे आम्हाला न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशाखाप्रमुख हितेंद्र राठोड यांनी आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली.
हा निर्णय आम्हाला अपेक्षितच होता अशी प्रतिक्रिया युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. हे एक मोठे षडयंत्र आहे असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. या निर्णयाविरुद्ध आम्ही सुप्रिम कोर्टात जाऊ अशी माहिती संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना दिली.
नार्वेकर यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला – खा. संजय राऊत
! राहूल नार्वेकर यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला., विधानसभा अध्यक्ष बेकायदेशीर, एकनाथ शिंदे यांना श्रीरामा नाव घेण्याचा अधिकार नाही. निकाल दिल्लीवरून आला आहे. बाळासाहेबांची शिवसैनिक संपणार नाही. हिंदुस्थानच्या इतिहासातील आज काळा दिवस आहे