आमदार सावरकर यांनी घेतले भौरद येथे श्रींच्या पालखीचे दर्शन
संत श्री गजानन महाराज अकोला येथील दोन दिवस मुक्काम
अकोला / प्रतिनिधी
अकोला : संत श्री गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर कडे रवाना झाली आहे. श्रींच्या पालखीचा आज अकोला शहराजवळील भौरद येथे मुक्काम पाहता भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी भौरद येथे संत श्री गजानन महाराजांच्या पालखीसोबत जाणाऱ्या वारकऱ्यांची विचारपूस केली तसेच त्यांच्या आरोग्य आणि भोजन व्यवस्था व पाणी तसेच राहण्याच्या व्यवस्था संदर्भात माहिती घेतली. शेगाव ते पंढरपूर सहाशे किलोमीटर पायी यात्रा करणाऱ्या वारकऱ्यांच्या या अभिनव कार्यक्रमात व विश्वास सर्वात मोठा चांगले मॅनेजमेंट असलेल्या व भक्तांच्या सुविधेसाठी कशा पद्धतीचे धार्मिक स्थळ असावी याचा आदर्श असणाऱ्या संत गजानन महाराज संस्थेच्या कारभारात उत्तम रीतीने सुरू असून त्यांच्या भक्ती आणि सेवे सोबतच कामाची पद्धत पाहून आमदार रणधीर सावरकर नतमस्तक झाले यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या धर्मपत्नी मंजुषाताई सावरकर तसेच भाजपा नेत्या माजी खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या पत्नी सुवासिनीताई धोत्रे खासदार अनुप धोत्रे यांच्या पत्नी समीक्षा ताई धोत्रे ह्या सुद्धा उपस्थित होता यावेळी त्यांनी वारकऱ्यांसोबत तसेच गावकऱ्यांसोबत सेवा देऊन भौरद येथील गावकऱ्यांचे सेवेबद्दल कौतुक केले. शनिवारी ही पालखी अकोला नगरीमध्ये मुक्कामासाठी येणार असून अकोल्यात या पालखीचा दोन दिवस मुक्काम राहणार आहे.
*संत श्री गजानन महाराज अकोला येथील दोन दिवस मुक्काम*
भाविकांसाठी पालकी दर्शनाची वेळ उद्या शनिवार दिनांक १५ जून खंडेलवाल विद्यालय डाबकी रोड येथे ■ सकाळी ९.३० ते ११.३० पर्यंत मुंगीलाल बाजोरिया शाळा मैदान येथे ■ दुपारी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत.. रविवार दिनांक १६ जून रोजी ■ शाळा क्रमांक १६ आदर्श कॉलनी गौरक्षण रोड, अकोला सकाळी ८ ते १० पर्यंत जिल्हा परिषद टाऊन हायस्कूल, हरिहर पेठ जुने शहर सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत राहिल