पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुणवत्ता सुधार प्रकल्प अंतर्गत व्याख्यान मालेचे यशस्वी आयोजन .
.
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, येथे गुणवत्ता सुधार प्रकल्प अंतर्गत गणित विषयासाठी पुणे , सांगवी येथील बाबुराव घोलप ज्युनिअर कॉलेज चे सेवानिवृत्त प्राचार्य तथा गणित विषय अभ्यास मंडळ सदस्य बाळकृष्ण मापारी सरांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. व्याख्यानात मार्गदर्शन करताना त्यांनी इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी ,प्रशिक्षण देणाऱ्या संस्था , देश विदेशातील नोकरीच्या संधी व गणित विषयातील संकल्पना यांचे आकलन कसे करून घ्यावे , याचे मार्गदर्शन केले. ८ वी ते १२ वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी गणितातील उपयुक्त आणि उपयोजित ज्ञानाचा उपयोग कसा करावा, हे उदाहरणासह स्पष्ट करून दाखविले.
इयत्ता ११ वी व १२ वी वर्गासाठी गणित विषयाच्या बोर्ड परीक्षा, नीट , जेईई, सीईटी यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी , याबद्दल मापारी सरांनी मार्गदर्शन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य अर्जुनराव भुजबळ सर यांनी अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना गुणवत्ता वाढ प्रकल्पाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन शैक्षणिक प्रगती करावी , यासाठी आग्रह धरला व उपक्रमासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या . यावेळी सतिष फापाळे सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अध्यक्ष निवड प्रवीण कुटे सर यांनी केली. तर अध्यक्षीय सूचनेला अनुमोदन श्री बापु रोहोकले सर यांनी दिले . पाहुण्यांचा परिचय संदीप लंके सर यांनी करून दिला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष ठाणगे सर यांनी केले .हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सचिन दुसुंगे ,राहुल नवले , सागर लोंढे, प्रवीण काळे, विजय दळवी, अमोल बारवकर , सोमनाथ चौधरी , सुवर्णा भुतारे, वैजंता बुगे, दिपाली शेळके , रेश्मा पठारे, अमृता देशमाने , नम्रता लाळगे आणि ज्ञानेश्वर भालेकर व इतरांनी परिश्रम घेतले व यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .