सामाजिक

आमदार प्रताप दादांनी चांदूर रेल्वेत भागीरथी खेचून आणली

Spread the love

चांदुर रेल्वेची चाळीस वर्षाची प्रतीक्षा , एकाचं वेळी संपवुन टाकली.

अमृत 2.0 मधून 63 कोटीच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी.

तालुका प्रतिनिधी – प्रकाश रंगारी

चांदुर रेल्वे शहराची दरवेळी वाढती लोकसंख्या त्यात शाश्वत जल स्तोत्राची कमतरता. मागील पंधरा वर्षात माझी लोक प्रतिनिधीचा उदासीन पणा त्यामुळे वेळेवर पाणी न मिळणाऱ्या चांदुर रेल्वे शहरासाठी आमदार प्रताप दादा आडसर यांनी भगीरथी खेचून आणत. अमृत-2.0 मधून तब्बल 63.61 कोटी रुपयाची ही पाणीपुरवठा योजना मंजूर करून चांदूर वास यासाठी जल संजीवनी आणली आहे . आगामी काही दिवसात या शहराला आता 24 तास स्वच्छ पाणी मिळणार आहे. आमदार प्रताप दादा अडसड यांनी युद्ध स्तरावर केलेल्या प्रयत्नामुळे यश मिळाला आहे.
तालुक्याचे केंद्रबिंदू असलेल्या चांदूर रेल्वे शहराची लोकसंख्या 25 हजाराच्या आसपास आहे. ह्या शहराला मागील 40 वर्षापासून मालखेड तलावातून पाणीपुरवठा केल्या जात होता. परंतु या तलावामध्ये उन्हाळ्याच्या शेवटी पाण्याची कमतरता भासत होती. त्यामुळे चांदूरवाशी यांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्या ऐवजी मागील काळात राज्यात सत्ता असतानाही माजी लोकप्रतिनिधी येथे पंधरा वर्षे केवळ आरोप प्रत्यारोपाचे राजकारण करत होते.
आमदार प्रताप अडसड यांनी पहिल्याच रेजिममध्ये

दिलेला शब्द पाळला…. चांदूरकरांना जल संजीवनी मिळणार.
चांदुर रेल्वे या शहराला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून प्रथम प्रकल्पाच्या पाण्याचे आरक्षण करण्यात आले. प्रधान सचिव के. एच. गोविंदराज यांच्या अध्यक्षतेखाली एक मार्च रोजी मुंबई येथे बैठक घेतली व 63.61 कोटीच्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मंजूर करून घेतली.

 

40 वर्षाची सुटणार पाणी समस्या

31 किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन टाकण्यात येणार असून शहरात पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहे. नगरपरिषदेवर विद्युत देयकाचा अधिभार पडू नये म्हणून सोलर पॅनल उभारण्याचे योजनेत समायोजन केलेले आहे. असे आमदार प्रताप दादा अडसड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे .

यावेळी धामणगाव विधानसभा प्रमुख रावसाहेब रेठे, भाजपा तालुका अध्यक्ष बबनराव गावंडे, शहराध्यक्ष बंडू भाऊ भुते, समीर भाऊ भेंडे, बच्चू वानरे, पप्पू भालेराव,अजय हजारे, प्राविण्य देशमुख, गोलू यादव, गोटू गायकवाड, विजय मिसाळ, अंकित कदम, दिपाली मिसाळ,जगदीश होले, तेजस वाट,रोशन बोडके,गजानन जुनगरे,सोनू पठाण, प्रदीप जडीत ,चौधरी,सुषमा खंडार सविता ठाकरे ती उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close