तरुणीला उचलत नेट फिल्मी स्टाईल घेतले सात फेरे
जैसलमेर / नवप्रहार न्यूज नेटवर्क
एखाद्या कथानकाला अहिभेळ असा प्रकार राजस्थानच्या जैसलमेर मध्ये घडला आहे. तरुणीचे पहिल्या मुलासोबत जुळलेले लग्न तोडल्याने आणि दुसरीकडे लग्न जोडल्याने संतापलेल्या तरुणांचे तिचे अपहरण करत जंगलात घेऊन गेला. आणि त्याठिकाणी आग पेटवत आगीच्या भोवताल सात फेरे घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता राजकारण सुरू झालं आहे.
संबधित घटनेतील सर्व आरोपींना अटक न केल्याने मुलीच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यावर आता केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ट्विट करत काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे. मेघवाल यांनी या घटनेचा व्हिडिओ ट्विट करत लिहिले की, ‘राजस्थानमध्ये काँग्रेसचे जंगल राज सुरू आहे
ही घटना मोहनगड पोलिस स्टेशनच्या सांखला गावातील आहे. 1 जून रोजी तरुणीसोबत ठरलेलं लग्न मोडल्यानंतर, त्या तरुणीचे दुसऱ्या ठिकाणी लग्न जमावल्यानंतर या तरुणाने तिचे अपहरण केले. फिल्मी स्टाईलमध्ये तरुणाने तिला जबरदस्तीने जंगलात नेले आणि आग पेटवून तिला उचलून घेत सात फेरे देखील घेतले आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मुलीच्या रडण्याचा आवाजही येत आहे.
मुलीचे अपहरण करणारे लोक मोकळे फिरत असून पुन्हा तिला पळवून नेण्याच्या धमक्या देत आहेत. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने मुद्दाम मुलीचे लग्न इतरत्र होऊ नये म्हणून बळजबरीने जंगलात फेऱ्या मारल्याचा व्हिडिओ व्हायरल केला. आरोपी मुलीची बदनामी करत आहेत. जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचे नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.(Marathi Tajya Batmya)लग्नानंतर फरार आरोपींपर्यंत पोलीस पोहोचू शकलेले नाहीत. आरोपींना न पकडल्याने संतप्त झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उग्र आंदोलन करून अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेमुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, 1 जून रोजी सकाळी 15 ते 20 जणांनी त्यांच्या मुलीचे घरासमोरून अपहरण केले. यानंतर आरोपीने मुलीसह तिला बळजबरीने निर्जनस्थळी नेले. फेऱ्या मारत असताना त्याने व्हिडिओही बनवला आणि घरच्यांना धमकावले. तर मुलीला इतरत्र लग्न न करण्याची धमकी देण्यात आली आहे.
दुसरीकडे, या घटनेबाबत डेप्युटी एसपी कैलाश विश्नोई यांनी सांगितले की, मुलीचे 1 जून रोजी अपहरण करण्यात आले होते. आम्ही मुलीला आणि आरोपी पुष्पेंद्र सिंगला पकडले आणि मुलीला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले आहे. मुख्य आरोपीला अटक करून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. उर्वरित फरार आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल असंही ते म्हणालेत.जैसलमेरच्या मोहनगड भागातील सांखला गावात शुक्रवारी लग्नाच्या वरातीत आलेल्या तरुणांनी लग्न मोडल्याचा राग मनात धरून भरदिवसा मुलीचे अपहरण केले. 12 जून रोजी तरुणीचे दुसरीकडे कुठेतरी लग्न होणार होते