महिला झाली गायब ; मोबाईल मध्ये सापडले असे काही की ..….
गोरखपूर / प्रतिनिधी
त्यांचे थाटामाटात लग्न झाले होते. त्यानंतर त्यांनी काही दिवस एकत्र घालवले. काही दिवसांनी पती कामाच्या शोधात बेंगळुरू ला गेला. त्याच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत ती माहेरच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाला घरी बोलावून घेत होती. ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात आल्याने परिसरात यावर चर्चा होऊ लागली. एक दिवस तिने तरुणाला घरी बोलावले आणि काही सामान सोबत घेऊन ते निघून गेले. पण जातांना तरुण मोबाईल तेथेच उतरला. आणि त्यामुळे त्यांच्या संबंधाचा भांडाफोड झाला.
नवीन लग्न झालेल्या तरुणीचे एका तरुणाशी विवाहबाह्य होते. म्हणून ते घरातून पळून गेले. मात्र, पळून जाताना त्यांच्याकडून एक चूक झाली. त्यामुळे पोलिसांसमोर सत्य उघडं पडलं.
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील सहजनवां पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिनवा गावात ही घटना घडली आहे. याच गावात राहणाऱ्या एका तरुणाचं सहा महिन्यांपूर्वी महाराजगंज इथल्या लेहडा भागात लग्न झालं. लग्नानंतर काही दिवसांनी तो तरुण कामानिमित्तानं बेंगळुरूला गेला. मात्र गावात राहणाऱ्या त्याच्या पत्नीने त्याच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेतला.
पत्नीचे तिच्या माहेरच्या जवळ राहणाऱ्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. ती तिच्या प्रियकराला फोन करून घरी बोलावून घ्यायची. सुरुवातीला कोणालाच तिच्या वागण्याचा संशय आला नाही, मात्र नंतर हे वारंवार होऊ लागल्यानं काही लोकांना संशय आला. तिचे सासरचे गोरखपूर शहरात राहतात. गावातल्या लोकांच्या मते, रविवारी (8 डिसेंबर) रात्री महिलेनं तिच्या प्रियकराला नेहमीप्रमाणे बोलावून घेतलं होतं. त्यांनी घरातून पळून जाण्याचा प्लॅन केला होता. त्यामुळे त्यांनी बॅग भरली. काही वेळ घरात थांबल्यानंतर ते घरातून बाहेर पडले, ते पुन्हा परतलेच नाहीत.
पण त्यांच्याकडून एक चूक झाली. प्रियकराचा मोबाईल चुकून तिच्या घरातच राहिला. यामुळे त्यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल सगळ्यांना समजलं. सासरच्या मंडळींनी त्यांचे मोबाईलमधले फोटो आणि मेसेज पाहिले. त्यानंतर जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. बेंगळुरूमध्ये कामासाठी गेलेला नवराही परत आला. त्याने पत्नीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पत्नीला आपण पसंत नव्हतो, तर तिनं लग्न का केलं?, असा प्रश्न त्यानं उपस्थित केलाय. यामुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं त्यानं म्हटलंय. महिलेच्या कुटुंबियांनी मात्र त्यांना या गोष्टीबाबत माहिती नसल्याचं म्हटलंय. तिनं स्वतःहून लग्नाला होकार दिला होता. त्यानंतरच लग्न ठरवण्यात आलं होतं, असं त्यांनी म्हटलंय.
गोरखपूरमधील या घटनेमुळे परिसरात चर्चेला विषय मिळाला आहे. गावातल्यांना या गोष्टीचा संशय आला होता. त्यात घरात सापडलेल्या तरुणाच्या मोबाईलमुळे त्याची खात्रीच पटली. पोलीस सध्या दोघांचाही शोध घेत आहेत.