क्राइम

एसआयटी च्या चौकशीत झाले धक्कादायक खुलासे 

Spread the love

बदलापूर / नवप्रहार डेस्क

                  येथिल नामांकित शाळेत दोन  चिमूरड्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात एसआयटी तपास करत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखला करत आरोपी अक्षय शिंदेला अटक केली. या घटनेने राज्यात खळबळ माजली आहे. विरोधी पक्षांनी या प्रकरणाचे रान उठवले आहे. त्यांनी राज्यात बंद देखील पुकारला होता. पण न्यायालयच्या आदेशामुळे विरोधी पक्षांना मोर्चा काढता आला नाही.

 एसआयटी कडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. यामध्ये  दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अल्पवयीन मुलींवर पंधरा दिवसांपासून अनेकदा लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक अहवाल सूत्रांच्या माध्यमातून समोर आला आहे.

आरोपीला मुलींच्या टॉयलेटमध्ये होती फ्री एन्ट्री

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाती आरोपी अक्षय शिंदेला ओळखपत्र नसतानाही शाळेतील आवारात आणि मुलींच्या टॉयलेटमध्ये फ्री एन्ट्री दिली जायची. कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी न तपासता आरोपी अक्षयला १ ऑगपासून कंत्राटी पद्धतीने कामावर नेमण्यात आलं होतं. बाहेरील एजन्सीकडून आरोपीला नोकरी देण्यात आली होती. या गंभीर प्रकरणाबाबत बाल हक्क आयोगाने शालेय व्यवस्थापनाला चौकशीच्या फेऱ्यात अडकवलं आहे. हे प्रकरणा हाताळण्यात शालेय व्यवस्थापनाने हलगर्जीपणा केल्याचं उघड झाल्यामुळे आयोगाने शालेय प्रशासनाला काही प्रश्न विचारले आहेत. सात दिवसांच्या आत शालेय व्यवस्थापनाला आयोगाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायचं आहे.

शालेय व्यवस्थापनावर पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई का करण्यात आली नाही? असा प्रश्न आयोगाने उपशस्थित केला आहे. ही घटना घडल्यानंतर दोन दिवस उलटले तरीही शाळेच्या कर्मचाऱ्यांकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. १४ ऑगस्टला शाळेच्या विश्वस्तांनी मुख्याध्यापकांना या प्रकरणाबाबत माहिती दिली. तक्रार केल्यानंतरी शाळेच्या कर्मचाऱ्यांनी पीडितीच्या पालकांची भेट घेतली नाही. रुग्णालयात अल्पवयीन मुलींवर १२ तास उपचार सुरु होते. मुलींचं टॉयलेट स्टाफरुमपासून दूरवर आहे. तिथे कोणत्याही प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे लावले नसल्याची माहिती आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close