ई,वर्ग जमिनीतुन गौण खनिज तस्करी
तस्करासोबत ग्रा.प.चे आर्थिक लागेबांधे
तहसिल प्रशासन गाढ झोपेत
जिल्हाधिकारी यांनी स्थळ पाहणी करण्याची गरज
महागांव तालुका प्रतिनिधी
किशोर राऊत
महागांव तालुक्यातील उटी या गावी महसुल विभागांची ई,वर्ग जमिन असुन सदर जमिन पुस नदीकिनारी असुन सुपिक आहे या जमिनीत गौण खनिज ,गाळ मोठ्या प्रमाणात आहे सदर गाळाची तस्कारामार्फत मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे तस्कर या मातीची राजरोसपणे तस्करी करीत असुन या कामी ग्रा.प. चे या तस्करासोबत आर्थिक लागेबांधे असुन यांचे मधुर सबंधातुन दररोज हजारो ब्रासची तस्करी होत आहे या कामी तस्कराने डोके चालवून ई,वर्गाच्या जवळील सातबारा दाखवून ई, वर्गातील गाळ विटा तयार करण्यासाठी ट्रॅक्टर च्या साहाय्याने दररोज शकडो ब्रास गाळ नेल्या जात असुन या कामी ग्रा.प ने आपणच ई. वर्गाचे मालक असल्यागत आपल्या अधिकारात सदर माती तस्कराच्या ट्रॅक्टर खेपिला २०० ते ५०० रुपये घेवुन ट्रॅक्टर सोडून दिले जात असत त्यामुळे मती तस्करांनी मोठ्या प्रमाणात मातीची तस्करी करून महागाव शहरासह तालुक्यातील अनेक विटभट्टी वाल्यांना दिले आहे ई वर्गातील माती व महागाव शहरासह तालुक्यातील विटभट्यावर असणारा मातीचा साठा ई वर्गातीलच असून विटभट्टीच्या मातीचे व ई क्लास च्या मातीचे मातीपरीक्षण केल्यास मातीतस्कर व ग्रा.प चे पितळ उघडे पडू शकते त्यामुळे तहसील प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांनी धडककृती कार्यक्रम राबवून मौजा उटी येथील ई वर्गाच्या स्थळाचे पंचनामे करून दोषी असणाऱ्यांनवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी जोर धरत आहे