राज्य
मेळघाटात भूकंपाचे धक्के ; जनतेत दहशत

परतवाडा (अमरावती) / नितीन दुर्बुडे
मेळघाट परिसरात भूकंपाचे हादरे बसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. आठ महिन्यात हा प्रकार दुसऱ्या वेळेस घडला आहे. रिक्टर स्केल वर भूकंपाची तीव्रता ३.८ असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
काल रात्री ९. ५७ मिनिटांवर मेळघाट परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. भीतीपोटी नागरिक घराबाहेर पडले. गेल्या आठ महिन्यात दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने नागरिक दहशतीत आहेत. मागील वर्षी ३० सप्टेंबर रोजी मेळघाट मध्ये भूकंपाचे धक्के बसले होते.
मध्यप्रदेश आणि
महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील मेळघाट पुन्हा भूकंपाने हादरले. गेल्या आठ महिन्यात दुसऱ्यांदा भूकंपाचे हादरे बसले आहेत. या झटक्यांनी परिसरातील नागरीक घराबाहेर आले. जिल्हा प्रशासनाने याविषयीची माहिती दिली आहे.
गेल्यावर्षी सौम्य धक्के
गेल्यावर्षी 30 सप्टेंबर रोजी अमरावती जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, अंजनगाव सुर्जी, अचलपूर या तालुक्यांसह काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य झटके बसले होते. अवघे काही सेकंद जमीन हादरल्याने नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला होता. अचानक जमीन हलल्यामुळे अनेकांची भीतीने गाळण उडाली होती. अनेकजणांनी घराबाहेर धाव घेतली होती. यामध्ये कोणतीही वित्त आणि जीवितहानी झाली नव्हती. घरातील पलंग हालला. तर शेल्फ, रॅकमधील भांडी खाली पडली होती. जमीन हादरल्याचे नागरिकांना स्पष्टपणे जाणवले होते. काही ठिकाणी घरांना चांगलेच हादरे बसले होते. तर मेळघाटातील चिखलदारा येथील काही घरांना त्यावेळी तडे गेले होते.
आता पुन्हा मेळघाटात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वर्षातून अचानक येणाऱ्या या पाहुण्याने नागरिकांची चिंता वाढवली आहे. धक्के तीव्र नसले तरी त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. या ताज्या धक्क्यांनी काय नुकसान झालं, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
जळगावपर्यंत भूकंपाचे धक्के
मेळघाटासह जळगाव जिल्ह्यातील काही भागांना या सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. जळगाव जिल्ह्यातील रावेर, खानापूर परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रावेर शहर आणि परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. कुठेही काही हानीची माहिती नाही. रावेर तहसीदार बंडू कापसे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत दुजोरा दिला. अनेकांनी धक्का जाणवल्यावर घराबाहेर येत कशामुळे हादरा जाणवला याची माहिती घेतली असता भूकंप झाल्याचे जाणवले. रावेर तहसीदार बंडू कापसे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत दुजोरा दिला असून या भूकंपाचा केंद्र बिंदू अमरावती असून सुमारे तीनशे ते चारशे किलोमीटर पर्यंत धक्के जाणवले आहे. भूकंपाची तीव्रता ३.५ रेक्टर स्केल एवढीअसल्याची नोंद करण्यात आली आहे