चार चाकी वाहनाच्या धडकेत चिमुकला ठार
राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद तालक्यातील निंबी येथे दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत रस्ता ओलांडत असताना एका दहा वर्षीय चिमुकला ठार झाल्याची घटना घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार वसंत नगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नींबी येथे आज २३ ऑगस्ट रोजी सकाळी आंदाजे साडेनऊ वाजताच्या दरम्यान वाशिम मार्गे पुसद कडे येणाऱ्या चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. १९ बी. जे. ७८४७ या चार चाकी वाहनाने निंबि येथील रहिवासी असलेला ओंकार किसन लांडगे वय १० वर्ष हा चिमुकला रस्ता ओलांडत असताना त्यास जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की ओंकार हा जागीच ठार झाला.ओंकार किसन लांडगे यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि पायावरून चार चाकी वाहन गेल्याने उजवा पाय गुडघ्यातून खाली तुटला. अपघात होताच येथील गावकऱ्यांनी धाव घेऊन मृतक ओंकार लांडगे यास खाजगी रुग्णालयात नेले असता त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मृतक ओंकार लांडगे यास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनाकरिता करिता आणण्यात आले.मृतक ओंकार लांडगे हा एकुलता एक मुलगा होता. वडील दोन ते तीन महिन्या पहिलेच वारले होते. आणि आई कामाकरिता पुण्याला आहे.मृतक ओंकार लांडगे हा लहानपणापासून त्याच्या आजीजवळ निंबी येथे राहत होता. पोलिसांनी पंचनामा केला असून घटनेतील चारचाकी वाहन वसंत नगर पोलीस स्टेशन येथे जमा केले आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन वसंत नगर पुसद करीत आहे. या घटनेने निंबी गावात शोककळा पसरली आहे.