इतका बेक्कार वास की अर्ध्या शो मधून खाली करावे लागले चित्रपट गृह


कॉरिडोअरमध्ये प्रेक्षकांची गर्दी
एक प्रेक्षक पादल्यामुळे सर्वजण चित्रपटगृहातून बाहेर पडून मल्टिप्लेक्सच्या कॉरिडोअरमध्ये उभे असल्याचं चित्रिकरण असलेला व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. शेकडो प्रेक्षक या कॉरिडोअरमध्ये दिसत असून यामध्ये स्पायडर-मॅनच्या वेशभूषेमध्ये आलेला स्पायडर-मॅनचा चाहताही दिसत आहे. प्रेक्षकांनी अचानक चित्रपटगृहाबाहेर पळ काढल्याने कर्मचाऱ्यांनी समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरु केले. मात्र अशा वेळी नेमकं काय करावं हे कर्मचाऱ्यांनाही कळत नव्हतं. चित्रपटगृहामध्ये सेंट्रलाइज एसी असल्याने दुर्गंधी बराच काळ तशीच होती.
चित्रपट अर्ध्यात सोडून गेले
मल्टीप्लेक्सकडून हा शो रद्द करण्यात आला नाही. मात्र चित्रपटगृहामध्ये दुर्गंधी कायम असल्याने अनेक प्रेक्षकांनी पुन्हा आत न जाण्याचा निर्णय घेत चित्रपट अर्ध्यात सोडून दिला.
स्टिंक बॉम्ब’ची शंका
या घटनेस कारणीभूत असलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र काही लोकांच्या मते हा सारा प्रकार पादण्याचा नसून ‘स्टिंक बॉम्ब’चा असू शकतो. ‘स्टिंक बॉम्ब’ म्हणजेच दुर्गंधी पसरवणारे साधन वापरुन कोणीतरी खोडसाळपणे हा शो बंद पाडल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. नेमका हा गोंधळ का झाला याबद्दल इंटरनेटवर वेगवेगळ्या चर्चा सुरु असल्या तरी काहींनी संबंधित व्यक्तीला चित्रपटात अडकून पडल्याने टॉयलेटला जाण्याचं भान राहिलं नसावं असंही म्हटलंय.
इंटरनेटवर मजेदार प्रतिक्रिया
या चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांच्या गर्दीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी अगदी शो अर्ध्यात सोडून जायला भाग पाडणाऱ्या दुर्गंधी पसरवण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या अज्ञात व्यक्तीची खिल्ली उडवली आहे. एकाने ‘एक्स’वर “With great power comes great responsibility… ही जबाबदारी तो वायू रोखून धरण्याची होती. तो काही साधा ‘वायू’ नव्हता, तर ते ‘ग्रीन गोब्लिन’चे अंतिम रूप होते,” असं चित्रपटांमधील संवादांचा संदर्भ देत म्हटलं आहे. अन्य एकाने, “ते सारे लोक चित्रपट बघायला गेले होते, पण त्या वासामुळे स्पायडर-मॅनसह सर्वांनाच बाहेर पळावे लागले! हे पाहून असं वाटतंय की खरा खलनायक आधीपासूनच चित्रपटगृहात होता,” असा खोचक टोला लगावला आहे. एकाने तर एवढी दुर्गंध पसरल्याच्या मुद्द्यावरुन, “चित्रपटापूर्वी त्या व्यक्तीने जे काही खाल्ले असेल, त्याला ‘शस्त्र’ म्हणून घोषित केले पाहिजे,” असं म्हटलं आहे.

