माऊली बहुउद्देशीय संस्था, घाटंजी पुढाकार ११३२ संविधान प्रस्ताविकेचे केले वाटप.
घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
घाटंजी -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचे औचित्य साधून माऊली बहुउद्देशीय संस्था, घाटंजी च्या वतीने १,१३२ संविधान प्रास्ताविक चे वाटप करून “हर घर संविधान” हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या उपक्रमाची सुरवात २६ नोव्हेंबर २०२२ संविधान दिवसापासून करण्यात आली होती. यामध्ये समजातील प्रत्येक घटकापर्यंत संविधनिक मूल्य पोचविण्याचा प्रयत्न संस्थेमार्फत करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील ७५ कोलाम पोडा पर्यंत ही संविधाननिक प्रास्तविक देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त पोहचविण्यात आले आहे. ह्या उपक्रमाची सांगता मा. जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे सर, मा. डॉ. पोलिस अधीक्षक पवन बन्सोड सर तसेच जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी श्री डॉ. श्रीकृष्ण पांचाळ सर यांना संविधान प्रास्ताविक भेट देत करण्यात आली. यावेळी
मान्यवरांनी ह्या उपक्रमाचे कौतुक केले. सोबतच हा उपक्रम पुढे ही चालू ठेवावा आणि त्यामध्ये आणखी काय विषय अंतर्भूत करता येईल याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. संस्थेच्या कामाबाबत यावेळी त्यांना माहिती देता आली. संस्थेचे काम प्रत्येक्ष बघायला लवकर येवू असे मान्यवरांनी आश्र्वासित केले.
संस्थामार्फत झरीजामणी, पांढरकवडा, आणि घाटंजी या तालुक्यात तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणी “समतेची शाळा” या उपक्रमाद्वारे बालकांना प्राथमिक संविधानाची ओळख करून दिली जाते. तसेच एकल महिलांसाठी “समतेची मकरसंक्रांत” ह्या उपक्रमाचे आयोजन करून संविधनिक मूल्य समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्यासाठी विवध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. सोबतच बालविवाह आणि कुमारीमाता हे प्रश्न निर्माण होवू नये म्हणून जनजागृती करून प्रतिबंधात्मक काम केले जाते. शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसार ही करण्यात येतो.
या उपक्रमासाठी संस्थेचे आकाश बुर्रेवार, स्वप्नील शेटे, सुनील हुड, विक्की ढवळे, नम्रता सामृतवार,
शारदा कनाके, बाबाराव आत्राम,
मुकेश चीव्हाणे,अमोल नडपेल्लीवार, आदेश कुंटलवार,इम्रान खान आदींनी परिश्रम घेतले.
‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ आणि इतर संविधाननीक मूल्य म्हणजे बाबासाहेबांच्या संपूर्ण जीवन आणि तत्वज्ञानाचे सार होय. या मूल्यसमुच्च्ययाचा समजातील प्रत्येक घटकापर्यंत प्रचार-प्रसार आणि उपयोजनाचा प्रयास करण्याचा प्रयत्न संस्थेतर्फे करून बाबासाहेबांना खरे अभिवादन करण्यात आले आहे.
माऊली बहुद्देशीय संस्था, घाटंजी.
माऊली संस्थेचे प्रमुख आकाश बुर्रेवार यांच्या संकल्पनेतील हा उपक्रम कौतुकास्पद असून समाजातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने काम करणे महत्वपूर्ण बाब आहे.
– श्री पवन बन्सोड
जिल्हा पोलिस अधीक्षक, यवतमाळ