मास विक्रेत्यांचा नागरिकांना होत आहे नाहक त्रास.

तालुका प्रतिनिधी- प्रकाश रंगारी
*चांदुर रेल्वे* : चांदुर रेल्वे नगरपरिषद ने मास विक्रेत्यांना शहराच्या बाहेर मास विक्री करण्याकरिता जागा दिलेली आहे. शहरातील लोकांना मास विक्रेत्याच्या व्यवसायातून होणारी दुर्गंधी त्याचा त्रास होऊ नये म्हणून बाहेर जागा दिलेली आहे. पण काही मास विक्रेत्यांनी स्वतःच्या घरीच मास विक्रीतेचे दुकान सुरू केलेले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकाच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होत आहे. चांदूर शहरामध्ये जुन्या अमरावती रोडवर काही मास विक्रेत्यांनी स्वतःच्या घराच्या समोर खुल्या चिकन विक्रीचा व्यवसाय सुरू केलेला आहे. येथे मास विक्रेते कोंबड्या कापून त्यांचे पंख व वेस्टेज गंदगी जवळच असलेल्या उर्दू स्कूलच्या मैदानावर फेकून देतात. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांना दुर्गंधीचा खूप त्रास होत आहे. आणि त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम सुद्धा होत आहे. मासविक्रेत्याला सांगायला गेल्यास ते भांडायला तयार होतात. त्यामुळे तेथील नागरिक लेखी तक्रार सुद्धा करायला घाबरत आहे. याबद्दलची माहिती नगरपालिकेला तोंडी स्वरूपात दिलेली आहे. त्यामुळे आता नगरपालिका लोकांच्या
सांगण्यावरून मासविक्रेत्यावर काय कार्यवाही करते याकडे लोकांचे लक्ष लागलेले आहे.