सामाजिक

बाजार समितीकरिता नेत्यांची लगबग, मोर्चा बांधणी करिता अनेक पक्षांनी कसली कंबर

Spread the love

नेर प्रतिनिधी / नवनाथ दरोई

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. नेर,दारव्हा, दिग्रस मतदार संघात नेर तालुक्यातील बाजार समिती निवडणूक,निवडून आलेल्या उमेदवारासाठी सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे.म्हणून या बाजार समितीकडे पाहण्याचा अनेक राज्यकर्त्यांचा मानस आहे. गेल्या दोन पंचवार्षिक पासून ही समिती शिवसेनेच्या ताब्यात होती. परंतु सेनेत शिंदे व उद्धव ठाकरे असे दोन गट पडल्यामुळे दोन्ही सेनेचे गट एकमेकाचे विरोधक झाल्यामुळे प्रस्तपितांना एक विरोधक आपोआपच मिळाला आहे. सेनेच्या दोन्ही गटाने बाजार समिती करिता कंबर कसली असून सेनेच्या गटबाजीचा फायदा घेण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर कटाक्ष ठेवून आहे. नेर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आणलेला माल उघड्यावर तर व्यापाऱ्यांचा माल शेडमध्ये ठेवत असल्याने सध्या तरी हि बाजार समिती शेतकऱ्याची हिताची वाटत नाही. निसर्गाप्रमाणे तालुक्यातील वातावरण बदललेली आहे.महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासोबत काही कार्यकर्ते शिंदे गटात गेले आहे. तर काही कार्यकर्ते महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या उध्दव ठाकरे गटात गेले आहे.अनेक कार्यकर्ते तर उद्धव ठाकरे गडाच्या कार्यक्रमातही व तेच कार्यकर्ते शिन्दे गटाच्या कार्यक्रमातही दिसून आल्याने हे कार्यकर्ते कोणत्या गटाचे आहे हे ओळखणे अशक्य झाले आहे. काही कार्यकर्ते तर पक्षाची निशाणी असलेला सेलाही खांद्यावर घेणे पसंत करत नाही. अलिप्त रहाणे पसंत करत आहे. अनेक कार्यकर्ते तटस्थ दिसून येत आहे. त्यातील काही लोकांच्या नजरा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर आहे. आपण केलेल्या कार्याची दखल आपला गट किती घेत आहे यांची वाट पाहत आहे. या दृष्टीने नेर येथील विश्राम गृहात विविध पक्षाच्या बैठकीचे सत्र सुरू आहे. बैठकामुळे अनेक पक्ष जागे होऊन हालचाली सुरू झाल्या आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Sumit Baniya

Related Articles

Back to top button
Close
Close