सामाजिक

विद्यार्थ्यां समवेत ज्येष्ठांनी केला योगासनांचा अभ्यास

Spread the love

 

घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा कोपरी खुर्द तथा एकल अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आज २१/६/२६ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा कोपरी येथे योगा अभ्यास सराव घेण्यात आला. सर्व प्रथम सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांचे पूष्प गुच्छ देवून स्वागत करण्यात आले.त्यानंतर ओंकार मंत्र झाल्यावर पद्मासन, वज्रासन,ताडासन, वृक्षांसन अशाप्रकारे अनेक आसने घेण्यात आली. विशेष म्हणजे या योगासन अभ्यायासला जेष्ठ नागरिकांनी व गावातील मान्यवर मंडळींनी योगा करत उपस्थित विद्यार्थी वर्गास मोलिक मार्गदर्शन केले यामधे गजाननराव मांडवगोडे, सुधाकरराव पांगुळ,वसंतराव देवूळकर, सोमाजी पूरके, आनंद कोडापे (शि.प्रे.),पसावत सर(स.शि.),एकल विद्यालय प्रमुख रवि आत्राम, अंगणवाडी सेविका गाढवे ताई, सुनिता ढाले, कान्होपात्रा वाकोडे, चंद्रकला मंत्रीवार व बहूसंख्य गावातील महिला उपस्थीत होत्या.
उपस्थित योगा मार्गदर्शक व मान्यवरांचे बोपटे सरांनी आभार मानले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन व शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.
००००००००००००००००००००
फोटो

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close