सामाजिक

संजय गांधी विद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती साजरी*

Spread the love

हिंगणघाट / प्रतिनिधी

शुक्रवार, दि. १२ जानेवारी  रोजी मा.श्री. सतीशजी वखरे, वरिष्ठ पत्रकार, कवी व लेखक हिंगणघाट यांनी “स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत आजच्या युवकांची कर्तव्ये” या विषयावर गुंफले. याप्रसंगी श्री.सतीशजी वखरे यांनी स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर आधारित छोट्या छोट्या कथांमधून विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला. व आजच्या युवकांची स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेली नेमकी कर्तव्य कोणती याबाबत मार्गदर्शन केले. तसेच राजमाता जिजाऊ यांनी शिवबाला कसे घडवले याबाबतही विद्यार्थ्यांना समायोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रुग्ण मित्र व सामाजिक कार्यकर्ते गजूभाऊ कुबडे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात श्री.गजू भाऊ कुबडे यांनी युवकांनी रुग्णसेवेचा वसा घ्यावा आणि आपल्या नातेवाईकांना, गोरगरिबांना, दीनदुबळ्यांना शक्य ती मदत करावी असा मोलाचा संदेश दिला. शाळेचे प्राचार्य श्री.मिलिंद मुळे यांनी युवक दिनानिमित्त स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांना वंदन करून व्याख्यानमालेची प्रस्तावना व उद्देश विशद केला. कार्यक्रमाचे संचलन श्री.एच.आर. डंभारे यांनी केले. तर आभार श्री. के.जी.वांदिले यांनी मानले.*
अतिशय उत्साहात विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडून “स्वर्गीय दादासाहेब कोल्हे व्याख्यानमाला” पार पडली.*
या व्याख्यानमालेसाठी फलक लेखनाचे काम प्रा. श्री.रवी आसुटकर, ध्वनी संयोजनाचे काम श्री.एम.व्ही.जवादे व श्री.के.डी.तडस यांनी केले. तर बैठक व्यवस्था श्री.व्ही.झेड.शेंडे व श्री.एन.बी.बेले यांनी केली. श्री. सी.एम.डहाके व श्री.एन.डी.कोळसे यांनी देखील या कार्यक्रमासाठी सहकार्य केले.*

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close