100 व्या भागातही जनतेच्या मनावर अधिराज्य….
खासदार सुनिल मेंढें यांच्या पुढाकारातून जिल्हाभर मन की बात.
भंडारा: देशातील प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात अभियानांतर्गत आज साजरा झालेल्या शंभराव्या विशेष भागाचे थेट प्रक्षेपण प्रत्येक गावात आणि हजारो लोकांनी अनुभवले. भर पावसातही लोकांच्या मनात मन की बात ने घर केले. खासदार सुनील मेंढे यांच्याकडून पोलीस बहुउद्देशीय सभागृह भंडारा विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
देशात ग्रामीण आणि शहरी भागातील वैशिष्ट्यपूर्ण अशा गोष्टी समाजापुढे घालणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाने आज विक्रम केला. आज 30 एप्रिल रोजी या उपक्रमातील शंभरावा भाग प्रक्षेपित करण्यात आला. शंभराव्या भागाचे प्रक्षेपण सर्वांसाठीच विशेष असल्याने त्याचे सर्व दूर प्रसारण व्हावे आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी यात सहभागी होण्याच्या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांच्या माध्यमातून भंडारा गोंदिया जिल्ह्यात विशेष प्रयत्न करण्यात आले. शक्ती केंद्रस्तरावर या कार्यक्रमाचे प्रक्षेपण एकत्रित येत कार्यकर्त्यांनी अनुभवले. गोंदिया आणि भंडारा येथे विशेष असे दोन मोठे कार्यक्रम घेतले. भंडारा येथील पोलीस बहुउद्देशीय सभागृहात व गोंदिया येथील अग्रसेन भवन येथे झालेल्या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंभराव्या भागा निमित्त आलेली पत्रे आणि शुभेच्छा संदेश वाचून भावूक झाल्याचे सांगताना हे यश माझे नसून श्रोत्यांची असल्याचे सांगत श्रोत्यांच्या मनात घर केले. माझ्यासाठी ‘मन की बात’ म्हणजे देवासारख्या जनतेच्या चरणी प्रसादाचे ताट आहे. ‘मन की बात’ हा माझ्या मनाचा आध्यात्मिक प्रवास झाला आहे. ‘मन की बात’ हा स्वत:पासून समाजापर्यंतचा प्रवास आहे असल्याचे सांग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यावधी देशवासी यांचे मनस्वी आभार मानले.
हा कार्यक्रम ऐकताना श्रोते काही वेळ भाऊक झाले होते. जणू काही एका कौटुंबिक सोहळ्याप्रमाणे आज संपूर्ण लोकसभा मतदारसंघात मन की बात हा कार्यक्रम ऐकला गेला.
याप्रसंगी भंडारा येथील कार्यक्रमात मा.शिवरामजी गिर्हेपुंजे जिल्हा अध्यक्ष भाजपा भंडारा, मा.आमदार नरेंद्रजी भोंडेकर, मा.मुकेश थानथराटे, मा.उल्हास फडके, मा.अनिल गायधने, मा.कैलाश कुरंजेकर, मा.आबिद सिद्दिकी, मा.प्रशांत खोब्रागडे, मा.विनोद बांते, मा.शितल तिवारी, मा.मयूर बिसेन, मा.नितीन कडव, मा.डीम्मू शेख, मा.राहुल देवगडे, मा.अतिश बागडे, मा.सूर्यकांत इलमे, मा.आशु गोंडाणे, मा.रुबी चढ्ढा, मा.क्रिष्णकुमार बतरा, मा.किशोर वाघाये, मा.फईम शेख, मा.अमित वसानी, मा.अन्गेश बेहलपाडे, मा.विकास मदनकर, मा.माला बगमारे,
मा.मंजिरी पनवेलकर, मा.शुभांगी मेंढे, मा.प्रीती चोले, मा.बापू धुमनखेडे, मा.सुनील कुरंजेकर, मा.राजेश करंडे, मा.श्रीकांत आकांत, मा.गज्जू कुरंजेकर, मा.गुड्डू वंजानी व आदी उपस्थित होते.
तसेच गोंदिया येथील कार्यक्रमामध्ये श्री पंकज जी रहांगडाले (जिल्हा परिषद अध्यक्ष गोंदिया) , माजी आमदार श्री गोपालदास जी अग्रवाल, माजी आमदार, श्री.रमेश भाऊ कुथे, बांधकाम सभापति श्री.संजय जी टेम्भरे, जिल्हा संघटन मंत्री संजय जी कुलकर्णी, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौ.भावना ताई कदम, जिल्हा ओबीसी आघाड़ी अध्यक्ष गजेंद्र जी फुंडे, जिल्हा सहकार आघाड़ी अध्यक्ष दीपक जी कदम,उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित जी झा ,व्यापारी आघाड़ी अध्यक्ष नारायण जी चांदवानी ,भाजपा शहर अध्यक्ष सुनील जी केलनका, शहर महामंत्री मनोज पटनायक, अंकित जैन, जसपाल सिंह चावला, गुड्डू चांदवानी, अशोक जयसिंघानी, पुरुषोत्तम ठाकरे, राकेश अग्रवाल, पंकज भिवगड़े, किशोर चौधरी, पंकज उइके व आदी उपस्थित होते.