हटके

माकडाचा तो व्हिडीओ होतोय खूप व्हायरल ; तुम्हीही कौतुक केल्याशिवाय राहणार नाही

Spread the love

नवी दिल्ली  / नवप्रहार मिडिया

                        माकडं मनुष्याचे पूर्वज आहेत असे म्हणतात.त्यांच्या वागणण्यावरून देखील अनेकदा तसा बोध होतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माकडाच्या एका व्हिडीओ ने धूम माजवली आहे.

काही चुकीची गोष्ट केल्यावर आई आपल्या मुलांवर रागवते. वेळप्रसंगी ती त्यांना मारतेही. माणसांप्रमाणेच प्राण्यांच्या बाबतीतही असंच असतं. प्राणीही आपल्या पिल्लांवर खूप प्रेम करतात आणि काही चुकीचं केल्यावर त्यांना त्यांच्या पद्धतीनं समजवतात. असंच दृश्य एका व्हायरल व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे.

माकड आणि त्यांच्या पिल्लांचा व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये माकड आपल्या बाळाच्या कानाखाली मारते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या आईची आठवण येईल. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.

माकडांच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, खूप सारी माकडे आणि त्यांची पिल्ले खेळताना दिसत आहे. अशातच एक मादी माकड आपल्या पिल्लाला ओढते आणि कानाखाली मारते. पिल्लू तिचं ऐकत नाही म्हणून ती त्याला मारते. शिस्त लावण्यासाठी माकड पिल्लाला मारत असल्याचं पहायला मिळतं. माणसंही असंच करतात. आपल्या मुलांना ते चुकीचं करताना थांबवण्यासाठी कधी तरी मारतातही.

@desimojito नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 7 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर भरपूर व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक कमेंटही येत असून प्राण्यांचीही तुलना माणसांशी केली आहे.

दरम्यान, प्राणीही माणसांसारखेच असतात आणि तसंच वागतात असं अनेक घटनांमधून पहायला मिळतं. असे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत असतात.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close