अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांना एकरी १५००० हजार तात्काळ मदत द्या – माजी आमदार चरण वाघमारे BRS
भंडारा: / जिल्हा प्रतिनिधी
तुमसर आणि मोहाडी तालुक्यासह संपूर्ण भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यातील मुख्य पीक धानाचे उत्पादन मुख्यत्व शेतकरी घेत असून राज्याचे सिंचन धोरणाकडे होणाऱ्या दुर्लक्षितपणा चा फटक्यामुळे सिंचन सुविधे अभावी केवळ धान हेच एकमेव उत्पन्न शेतकऱ्यांना घ्यावे लागत आहे.
एकच पीक उत्पन्नाच्या भरोशावर तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील शेतकरी बांधव विसंबून असताना ऐन धान पिकाची कापनी हंगामात मागील दोन दिवसापासून अवकाळी झालेला पाऊसामुळे, शेतात कापून ठेवलेले धान, आणि कापणीसाठी शेतातील उभे असलेले पिकाची मोठ्या प्रमाणात पाणी साचून जवळपास ८० टक्के नुकसान झालेली असताना शासन मात्र मूग गिळून गप्प बसलेला आहे.
आकस्मिक पाऊस आल्याने मोहाडी, आणि तुमसर तालुक्यातील सम्पूर्ण गावाचे धान पिकाचे नुकसान झाले .घरी खायला पण तांदूळ येईल ही पण अपेक्षा नाही. शासनाने आता थेट पावसाचे आणि वातावरणातील ओलसर पणा लक्षात घेऊन सरसकट कोणताही पंचनामा न करता, कोणतेही अर्ज न मागविता, थेट एकरी १५००० हजार नुकसान भरपाई तात्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी अन्यथा भारत राष्ट्र समिती तर्फे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करण्यात येईल असा ईशारा भारत राष्ट्र समिती पूर्व विदर्भ समन्वयक तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे शासनाला केले आहे.