क्राइम
महिलेकडून प्रियकराचा खून , नवरात्रात केली हत्या

कोटा / राजस्थान
महिलेकडून लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या तरुणाचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेने आपला गुन्हा कबूल केला आहे. तरूणाच्या कृत्याला कंटाळून हा खून केल्याचं महिलेनं सांगितलं आहे.
रामगंजमंडी येथील नरेश (३० वर्ष) असे मृत व्यक्तीचं नाव आहे. तर, किरण बाई असं खून करण्यात आलेला लिव्ह इन पार्टनर महिलेचं नाव आहे. किरण बाईला पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली आहे.
किरण बाईनं पोलिसांना सांगितल्यानुसार, नरेश दगडं फोडण्याचं काम करत असे. गेल्या आठ महिन्यांपासून नरेश बरोबर लिव्ह ईन पार्टनर म्हणून ती राहत होती. किरणचं पहिलं लग्न झालं असून, तीला दोन मुलंही आहेत. पण, नरेशबरोबरील प्रेमप्रकरणानंतर ती पळून कोटाला आली होती. दोघेही गणेशपाल परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. पण नरेश हा दारू पित असल्याने तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता आणि तिला मारहाण करीत होता.
अशातच नरेशनं किरणचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ तिच्या पतीला पाठवले. यानंतर पतीला पैसे मागावे, नाहीतर सगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी नरेशने किरणला दिली होती. या धमक्यांना किरण वैतागली होती. यातूनच नरेशचा खून करण्याचा प्लॅन तिनं आखला
किरणनं घरात घटस्थापना केली होती. त्याचदिवशी किरणनं नरेशचा खून करायचं ठरवलं. रात्री बारा वाजल्यानंतर झोपलेल्या नरेशवर किरणनं हल्ला केला. दगडानं ठेचून किरणनं नरेशचा खून केला. यानंतर पूर्ण रात्र खोलीच्या बाहेर किरण येऊन बसली होती. सकाळी लवकरच ती निघून गेली.
दोन दिवस मृतदेह खोलीत पडून होता. मृतदेहाचा कुजलेला वास आल्यानंतर ही घटना समोर आली आहे. याप्रकरणी नरेशच्या वडिलांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. तपासानंतर पोलिसांनी किरणला मध्य प्रदेशातून अटक खून केल्यावर किरण मध्य प्रदेशातील पहिल्या पतीकडे गेली होती. पण, पतीनं तिला स्विकारण्यास नकार दिला.