लोकसभा निवडणूकीत शेतक-यांच्या संतापामुळे महायुतीची माती
विदर्भात दहा पैकी एकही जागा जिंकणार नाही- सिकंदर शहा
प्रतिनिधी यवतमाळ
केन्द्रातील भाजपा सरकारने शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आमिश दाखवून सन 2014 तसेच 2019 मध्ये सत्ता हस्तगत केली. प्रत्यक्षात मात्र देशभर उदयोगपतींना पुरक तसेच शेतीविरोधी नितीचा अंमल केला. त्यामुळे शेतक-यांमध्ये प्रचंड संताप आहे. नुकत्याच पार पडलेल्या पहील्या तसेच दुस-या टप्प्यातील विदर्भातील दहाही लोकसभेच्या जागेवर महायुतीमधील एकही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा सर्व शेतक-यांच्या संतापाचा परीणाम असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी व्यक्त केली आहे.
शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आमिष दाखवून नरेन्द्र मोदी सत्तेत आले. आज मात्र देशातील शेतक-यांची विदारक परीस्थिती असून शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करायचे सोडून त्यांचे उत्पन्न अर्धे करुन टाकले आहे. मोदी यांचा सन 2014 ते 2019 आणि सन 2019 ते 2024 हा कार्यकाळ वादग्रस्त ठरला आहे. त्यांच्या कार्यकाळातील काळया कायद्यांना प्रचंड विरोध झाल्याने त्यांना हे कायदे परत घ्यावे लागले. शेतक-यांच्या आत्महत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. विदर्भात मोठया प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते मात्र हा कापूस सुध्दा आधारभूत किंमतीपेक्षाही कमी भावात खरेदी करण्यात आला. पिकविम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकरी संकटात आहे. त्यामुळेच शेतक-यांनी लोकसभा निवडणूकीत मतांच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केल्याचे सिकंदर शहा यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे शहा यांनी निवडणूकीपुर्वीच शेतक-यांना मतदानाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त करण्याचे आवाहन केले होते. यवतमाळ जिल्हयातील दाभडी येथे येऊन नरेन्द्र मोदी यांनी चाय पे चर्चा कार्यक्रमात शेतक-यांना लागत मुल्याच्या दिडपट भाव देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात आधारभूत किंमती पेक्षाही कमी किंमतीत शेतीमाल खरेदी केला जात आहे. बियाणे, खते, फवारणी खर्च दुप्पट झाला मात्र शेतीमालाची किंमत वाढली नाही. त्यामुळे विदर्भातील शेतकरी भाजपाच्या विरोधात गेल्याचे मत शहा यांनी व्यक्त केले आहे.
शेतक-यांची मुले बेरोजगार
शेतक-यांनी शेती परवडत नाही म्हणून आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले मात्र नोकरी नसल्याने ते बेरोजगार बनून जिवन जगत आहे. शिक्षणामुळे ही मुले शेतीत सुध्दा काम करीत नाही, दुसरीकडे नोकरी पण नाही अशी विदारक परीस्थिती असल्यामुळेच शेतक-यांनी आपला संताप मतदानातून व्यक्त केल्याची प्रतिक्रिया सिकंदर शहा यांनी व्यक्त केली आहे.