राजकिय

महायुती सरकार देशाच्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी 

Spread the love

आपण चंद्रयान पाहिले आता गगनयान देखील पाहणार 

तळेगाव शा.( वर्धा )/ प्रतिनिधी 

                           आज वर्धा जिल्ह्यातील तळेगाव शामजी पंत येथे झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी महायुती सरकार चे गुणगान गाण्या सोबत इंडिया आघाडीवर सडकून टिका केली आहे. यावेळी त्यांनी मराठीत म्हण म्हणून उपस्थितांची माने जिंकली. सोबतच त्यांनी मतदारांना भाजपा उमेदवारांना जिंकवून देण्याचे आवाहन केले.

                    तळेगाव (वर्धा) येथे वर्धेचे भाजपा उमेदवार रामदास तडस आणि अमरावती महिला उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी महाराष्ट्रातील भूमीतून मराठीत भाषणाला सुरुवात केली.भाषणाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या आणि विदर्भातील संतांचे गुणगान गायले. चैत्र एकादशीनिमित्ताने पंढरपूरच्या विठुरायाला वंदन करतो, असे मोदींनी म्हटले. आपलं प्रेम आणि आशीर्वाद मोठ्या प्रमाणात आहेत. या सभेसाठी लोकांचा उत्साह आणि गर्दी पाहून मी भारावल्याचे मोदींनी म्हटले. मोदींनी आपल्या सभेत पुन्हा एकदा मराठी म्हणीचा वापर करुन विरोधकांना टोला लगावला.

आपल्या देशात 2024 पूर्वी नैराश्याचे वातावरण होते. वीज, पाणी, रस्त्यांच्या अनेक गावात समस्या होत्या. मात्र, गेल्या 10 वर्षात आपल्या सरकारने 25 कोटी भारतीयांना गरिबातून बाहेर काढले. देशात 50 कोटींहून अधिक बँक खाते नव्याने उघडले आहेत. आता, विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचं स्वप्न दूर नाही,असे मोदींनी म्हटले. मोदी जो गॅरंटी देतो, त्यासाठी दिवसरात्र खपायला मी तयार आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे की, पुढील 5 वर्षात ३ कोटी घरं बनवणार. नळाद्वारे प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचणार आहे. आपल्या कुटुंबातील वृद्ध, आई-वडिल यांच्यावरील उपचार खर्चासाठी 5 लाख रुपयांपर्यतचा खर्च शासन करणार आहे. तसेच, ज्याप्रमाणे नळातून पाणी येते, तशाच रितीने पाईपमधून गॅस येणार आहे. देशातील प्रत्येक कोपऱ्यात वंदे भारतप्रमाणे रेल्वे धावतील. भारताने चंद्रयान पाहिले, आता गगनयानही पाहणार आहे, असे आश्वासन मोदींनी दिले.

काँग्रेस आघाडीवर मोदींची टीका

काँग्रेस आणि इंडी आघाडी नेहमीच विकासविरोधी आणि शेतकरी विरोधी राहिली आहे. त्यामुळेच, देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. काँग्रेस आघाडीच्या कामकाजासाठी मराठीत एक म्हण आहे, बारशाला गेला आणि बाराव्याला आला… असे म्हणत मोदींनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर बोचरा वार केला. यापूर्वी नागपूरच्या पहिल्या सभेतही मोदींनी मराठी म्हणीचा उल्लेख केला होता. त्यावेळी, पाण्यावर काठी मारल्यानंतर पाणी दुभंगत नाही, असे मोदींनी म्हटले होते. आता, पुन्हा एकदा मराठी म्हणीतून काँग्रेसवर हल्लाबोल केला.

दरम्यान, यावेळी, राज्यातील महायुती सरकार महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि विविध योजनांसाठी काम करत आहे. सिंचन योजना, दळणवळण यांसह अनेक क्षेत्रात महाराष्ट्रात मोठं काम होत असल्याचंही मोदींनी म्हटलं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close