क्राइम

प्रेयसीच्या जाचाला कंटाळून तरुणाने मृत्यूला कवटाळले 

Spread the love

नागपूर / नवप्रहार डेस्क

                     अनैतिक संबंधात अनेक वेळा आपण प्रियकाराकडून छळ झाल्याने किंवा बदनामीची धमकी देत तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे ऐकले असेल . पण प्रेयसी कडून प्रियकराला धमकावून त्याला बदनामीची धमकी देऊन छळ केल्याचे फार कमी ऐकायला मिळते. पण असा प्रकार संत्रानागरी म्हणून ओळख असलेल्या नागपूर शहरात घडला आहे. येथे एका तरुणाने प्रेयसीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे.

आकाश अमर गोईकर (रा. विठ्ठलवाडी) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा पारशिवनीतील आयटीआयमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी होता. सदर युवती ही मनीषनगरमध्ये खासगी दुकानात काम करायची.

२९ मे २०१९ मध्ये आकाशचे लग्न झाले. त्याला एक वर्षाची मुलगी आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये आकाशची युवतीसोबत ओळख झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबत आकाशची आई व नातेवाइकांना कळताच, त्यांनी युवतीच्या घरी जाऊन तिची समजूत घातली.

मात्र, तिने संबंध संपुष्टात आणण्यास नकार दिला. त्यानंतर तिने आकाशची सातत्याने पिळवणूक केली. शिवाय संबंध संपुष्‍टात आणल्यास बदनामीची धमकीही दिली. त्यामुळे आकाश तणावात होता. नोव्हेंबर २०२३ मध्ये युवतीचे अन्य एका युवकासोबत साक्षगंध झाले. यावेळीही तिने प्रेमसंबंध तोडण्यास नकार दिला. डिसेंबर महिन्यात मुलीचा वाढदिवस असल्याने आकाश, त्याची पत्नी मुलीसह खरेदीसाठी गेले.

यावेळी युवतीने आकाशच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्याच्याशी वाद घालून शिवीगाळ केली. माझे घर उद्‍ध्वस्त केल्याचा आरोप केला. या घटनेनंतर आकाशची पत्नी मुलीसह माहेरी गेली. आकाश तणावात राहायला लागला. १५ मार्चला रात्री १०.३० वाजता आकाश घरी आला.

त्याच्या खोलीत गेला. पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. १६ मार्चला सकाळी ९ वाजता ही घटना उघडकीस आली. हुडकेश्वर पोलिसांनी आकाशने लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. युवती ही माझा फायदा घेत असून, आर्थिक छळ करीत आहे. मी आत्महत्या करीत आहे.

तिला मृत्यूची शिक्षा व्हावी, असे चिठ्ठीत लिहिले आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी युवतीविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close