महाराष्ट्र राज्य केळीरत्न कार्यगौरव पुरस्काराने प्रा.दिनकर जायले सन्मानित….
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
२०२४चा कृषी क्षेत्रातील राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य केळीरत्न कार्य गौरव पुरस्कार जय हनुमान टिशू कल्चर लॅब चे संचालक दिनकर जायले यांना देण्यात आला असून कंदर ता. करमाळा जि. सोलापूर येथील दुसरी राज्यस्तरीय केळी परिषद या कार्यक्रमात दि.३१ मे ला आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील तसेच महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष अतुलनाना माने पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती पुरस्कार देण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की , महाराष्ट्र राज्य केळी महासंघातर्फे देण्यात येणारा केळी रत्न कार्य गौरव पुरस्कार २०२४ प्रा. दिनकर जायले यांना देण्यात आलाअसून मागील १२ वर्षापासून संपूर्ण विदर्भ तसेच महाराष्ट्रभर उच्च प्रतीचे केळीचे टिशू कल्चर रोपे शेतकऱ्यांना दिले जातात त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी आर्थिक दृष्ट्या संपन्न होण्यास मदत झाली एवढेच नाही तर या लॅबमध्ये विविध विषयावर शेतकऱ्यांकरिता कार्यशाळेच्या आयोजन करून नवनवीन तंत्रज्ञान बद्दल माहिती दिली जाते तसेच विविध कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांचे प्रोजेक्ट वर्क व प्रशिक्षण पूर्ण करण्यात येतात याव्यतिरिक्त विदर्भातील विविध महाविद्यालया सोबत एम ओ यु अंतर्गत विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान बद्दल मार्गदर्शन केले जाते .
हा पुरस्कार सोहळा दि.३१ मे ला कंदर ता. करमाळा जि. सोलापूर येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व ती उद्घाटक माननीय श्री रणजीत सिंह मोहिते पाटील(आमदार विधान परिषद) कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अतुल नाना माने पाटील (संस्थापक अध्यक्ष म. रा. ऊस उत्पादक संघ) प्रमुख मार्गदर्शक मा. किरण भाऊ चव्हाण (संस्थापक अध्यक्ष म.रा . केळी महासंघ)तसेच विनोद तराळ ,सचिन कोरडे, अनंता इंगळे,संतोष पाटील जायले, गोपाल मोहड ,विजय बरदे व राज्यभरातील हजारोच्या संख्येने केळी उत्पादक शेतकरी या परिषदेला हजर होते केळी रत्न पुरस्कार बद्दल प्रा. दिनकर जायले यांचे सर्वत्र शेतकऱ्यांकडून कौतुक केल्या जात आहे