सामाजिक

महाज्योतीच्या जेईई मेन प्रशिक्षकांचा गौरव स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला सत्कार.

Spread the love

 

नागपूर दि. 9 मार्च 2023:
दिनांक आठ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून जेईई मेन्स परीक्षा प्रशिक्षण योजनेच्या यशस्वीतेसाठी महाज्योतीच्या प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मा. राजेश खवले यांच्या हस्ते प्रशिक्षकांना स्मृतीचिन्ह देऊन गौरवीण्यात आले.
जेईई मेन ही भारतातील सर्वात मोठी अभियांत्रिकी परीक्षा आहे. देशातील आयआयटी आणि इतर प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. नुकताच जेईई मेन 2023 या परिक्षेचा निकाल जाहिर झालेला आहे. यात महाज्योतीतर्फे राबवण्यात येत असलेल्या जेईई मेन्स प्रशिक्षण योजनेतील 13 विद्यार्थी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेऊन झालेत. आपल्या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी महाज्योतीला आणि जेईई मेन परीक्षा प्रशिक्षण योजने अंतर्गत ऑनलाईन शिकवत असलेल्या प्रशिक्षकांना दिलेले आहे.
गौरवाचे मानकरी ठरलेले प्रशिक्षक पाणिनी तेलंग, नारायण शर्मा, अरवींद सींग, साजिद अली सर, किर्ती देवी मुलगुंदकर. सहायक प्रशिक्षक, नगमानाज ताज पठाण, पल्लवी चरणदास कुकडकर, प्रसन्न देशपांडे, संतोष गौतमचंद बोहरा, सालेहा शेख यांनी नियमित, वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी जुळून त्यांना समजेल असे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणातील अडचणी दुर सारुन वेळोवेळी त्यांच्या शंकेचे निरसन केले. परीक्षा काळातील ताण-तणाव दुर करुन विद्यार्थ्यांची कार्यक्षमता वाढवली. याप्रसंगी व्यवस्थापकीय संचालक मा. राजेश खवले यांनी अधिक गुणवत्ता देण्यासाठी प्रशिक्षकांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक लेखाधिकारी जयश्री बोदेले यांनी केले. आभार प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठ यांनी मानले. कार्यक्रमास महाज्योतीचे प्रमुख अधिकारी, प्रशिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.

*प्रकल्प व्यवस्थापक*
महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती). महाराष्ट्र राज्य, नागपुर

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close