ब्रेकिंग न्यूज

मद्यधुंद  महिला कार चालक पोलिसाची दुचाकी स्वाराला धडक 

Spread the love
दुचाकी स्वार जखमी ; नागरिकांनी जाब विचारताच महिला पोलिसाने काढला पळ 
वर्धा / प्रतिनिधी 
  महिला पोलिसांची दारूच्या नशेत कार चालवत दुचाकी स्वाराला धडक दिल्याची घटना वर्धा शहराच्या रामनगर ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. घटनेनंतर त्या महिला पोलिसाला जाब विचारणाऱ्या नागरिकांना धाकडपट करत तिने घटना स्थळावरून काढता पाय घेतला. या घटनेत दोन लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे.  
मागील सिटवर एक अमलदार निपचित होता पडून – ज्या वाहनाने हा अपघात घडला त्या वाहनाच्या मागील सीटवर यरक।अमलदार निपचित पडून होता. त्या अमलदाराचे वर्तन मोबाईल कॅमेरात कैद झाले आहे. 
दारू बंदी जिल्ह्यात दारू कशी –  वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा असल्याने येथे पूर्णतः दारूबंदी आहे. असे असतांना सुद्धा या जिल्ह्यात सर्रास दारू उपलब्ध होते. ज्या विभागावर अवैध दारू विक्रीवर अंकुश लावण्याची जबाबदारी आहे. त्याच विभागातील कर्मचारी जर दारू पित असतील तर  शहराचे काय ? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे. 
अश्या दारुड्या कर्माचाऱ्यावर विभाग करणार का कारवाई ?  – दारूबंदी जिल्ह्यात दारू पिऊन असे कृत्य करणाऱ्या आणि विभागाची लत्करे वेशीवर टांगणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर पोलीस विभाग कारवाई करेल काय ? असा प्रश्न सुद्धा जनतेकडून उपस्थित केला जात आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
1
+1
2
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close