लूटमार करणारी टोळीला स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक
पोलीस अधीक्षेकाच्या आदेशावर कार्यवाई, जबरी चोरीचे गुन्हे उघडकिस,
नेर:- नवनाथ दरोई
नेर तालुक्यातील इंद्रठाना, दहिफळ रोडवर स्वतःच्या शेता समोर उभे असलेल्या सौ छाया सुरेश महल्ले हे त्यांच्या शेतातील काम आटपून घरी जाण्यासाठी रस्त्यावर उभे असतानी एम. एच. 29 बीजे1041 स्पिलेंडर प्लस या दुचाकी वर तीन स्वार त्या ठिकाणी थांबून त्यांनी फिर्यादीच्या गळाला चाकू लावून, तोंड दाबून त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत, नाकातील बेसळ असा एकूण वीस हजार तीनशे पन्नास रुपयाचे सोण्याचे दागिने बळजबरीने हिसकावून या चोरट्यांनी तेथून पळ काढला. सदर घटनेची तक्रार फिर्यादीने नेर पोलीस स्टेशनला नोंदवली. सदर गुन्हेची माहिती यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना कळतात त्यांनी या घटनेची दखल घेऊन. पोलीस स्टेशन नेर स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे पथक नेमून पथकास गुन्हा कसा उघडकिस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक पवन बनसोडे यांनी सुचनेतून मार्गदर्शन केले. पोलीस अधीक्षक च्या सूचनेवरून पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन नेर व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पोलीस स्टेशन आर्णी व दारव्हाच्या हद्दीत रवाना झाले असता आरोपीने वापरलेल्या दुचाकीचा शोध घेत असताना हे मोटर सायकल आर्णी तालुक्यातील अंतरगावातील सचिन दिलीप राठोड वय वर्ष 23 यांची असल्याची समजले. आरोपी राठोड यास ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता दहिफळ ईद्रठाणा रोडवर उभे असलेल्या महिलाला चाकूचा धाक दाखवून महिलेचे मंगळसूत्र व दागिने इतर पाच सहकाऱ्याच्या मदतीने लुटल्याची कबुली दिली. त्यांच्यासोबत सदर गुन्ह्यामध्ये असणारे अन्य आरोपी बजरंग बाबाराव जाधव, वय वर्ष 19 राहणार शेलोडी, सुदर्शन दत्तराम चव्हाण वय वर्ष 22 धनगरवाडी, कुनाल राजेश्वर पाटील वय वर्ष 21 राहणार शेलोडी, सावंत सुधाकर परसोडे वय वर्ष 22 राहणार साजेगाव, सागर रामराव म्हात्रे राहणार साजेगाव, तालुका दारव्हा हे सवंगडी सोबत असल्याचे कबुली दिल्याने पोलीस स्टेशन नेर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरील सर्वच आरोपींना ताब्यात घेऊन या व्यतिरिक्त कोण कोणते गुन्हे केले असल्याचे सखोल चौकशी केली असता, चाकूचा धाक दाखवून ग्राम शिवणी अंजनखेड, पाभळ रस्त्यावरील महिलांचे दागिने बळजबरीने चोररेल्याची कबुली दिली. सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन आर्णी येथे अपराध क्रमांक 542/ 562/ 536, 2023 कलम नुसार 392 भा.द.वी. नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कारवाई यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पवन बनसोड,अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा आदित्य मिरखेलकर, यांच्या मार्गदर्शनात आधारसिंग सोनवणे, पो. नि. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ,आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार,केशव ठाकरे,नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब नाईक,गणेश वनारे, किशोर खंडार, गणेश हिळूरकर, दीपक बदरके, गजानन अजमेरे यांच्या पथकातील आमदार, राजेश चौधरी, नरेंद्र लावरे,मनोहर पवार, बबलू चव्हाण, सतीश चौधरी, सैय्यद अनिस, विजय चव्हाण, किशोर झेंडेकर, योगेश सलामे, आमीत झेंडेकर, अमित कुंमरे, पवन ढवके, राजेंद्र सरदारकर, सचिन ठाकरे यांनी यशस्वीरीत्या काम पार पाडले.