दीर्घ प्रयत्नाने नेट NET परीक्षा उत्तीर्ण

(हिवरखेड) /जितेंद्र फुटाणे
हिवरखेड येथील प्रतिष्ठित शेतकरी श्री. साहेबरावजी होले यांची कन्या कु. शुभांगी साहेबराव होले ( देवघरे) हिने पदवी शिक्षणापासूनच सेट (राज्य पात्रता परीक्षा) आणि नेट (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेची तयारी केली. अनेकदा ती यशाच्या जवळ जाऊनही अपयश मिळाले तरीसुद्धा खचून न जाता तिने प्रामाणिकपणे सतत प्रयत्न करून डिसेंबर २०२४ च्या परीक्षेत अखेर तिने यश संपादन करून गावाला लौकिक मिळवून दिला आहे.
विशेष म्हणजे तीचे लग्न झाल्यानंतर तिच्या पतीने आणि सासरचे मंडळींनी तसेच आईवडील, भाऊ- बहिणींनी तिला या परीक्षेबाबत सतत प्रोत्साहित करून हे यश मिळवण्यात महत्वाचा वाटा उचलल्याचे म्हटले आहे . या यशाचे श्रेय ती पती देवघरे तसेच आप्त- स्वकीय, मित्र परिवार तसेच गुरूजन यांना दिले आहे.
या यशाबद्दल प्रा. सुभाष पारीसे, प्रा. अमोल इंगळे , प्रा. मेघा सोमकुवर तसेच जितेंद्र फुटाणे यांनी खूप खूप अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचाली करीता शुभेच्छा व सदिच्छा दिल्या . या यशामुळे तिचे गावातील स्नेही मंडळींनी सुद्धा कौतुक अभिनंदन केले आहे